Saturday, November 16, 2024

Latest Posts

तुपकर यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा

| TOR News Network | Buldhana Lok Sabha Election : शेतकऱ्यांचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे.त्यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.येत्या २ एप्रिल रोजी निवडणुकीचा अर्ज दाखल करणार असत्याचे त्यांनी जाहीर केले आहे.त्यामुळे आता बुलढाण्यात त्यांचा थेट सामना शिंदे गटाचे व विद्यमान खासदार प्रताप जाधव यांच्याशी होण्याची शक्यता आहे.जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही. (Ravikant tupkar to contest from buldhana)

मी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Election 2024) निवडणूक लढवणार असून येत्या २ एप्रिल रोजी निवडणुकीचा अर्ज दाखल करणार, अशी घोषणा रविकांत तुपकर यांनी केली आहे. सातगाव भुसारी येथील निर्धार मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली आहे. माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, तरुण व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तुपकर यांनी केले आहे.

शेतकऱ्यांचे फायरब्रँड नेते म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख आहे. (Farmer FireBrand Leader Tupkar) शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेली आंदोलने राज्यभरात गाजली आहेत. फक्त बुलढाण्यातच नाही, तर संपूर्ण राज्यातील बहुतांश शेतकरी तुपकर यांच्या पाठीमागे ठापमपणे उभे आहेत. आता त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर अनेकांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

निवडणूकीसाठी वर्गणी देण्यास सुरुवात

काही जणांनी तुपकर यांना निवडणूक लढवण्यासाठी वर्गणी देण्यास सुरुवात केली आहे. सध्या तुपकर संपूर्ण जिल्हा पिंजून काढत असून त्यांच्या सभांना लोकं तुफान गर्दी करीत आहेत.(huge crowd to tupkars rally) बुलढाणा जिल्ह्यात तुपकरांची एक लाट निर्माण झाल्याचे चित्र आहे. महायुतीचे उमेदवार व रविकांत तुपकरांमध्ये लढत होण्याची चिन्हे सध्या मतदारसंघात दिसत आहेत.

बुलढाण्यात उमेदवारीचे समीकरण बदलले

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मागील तीन टर्मपासून शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हेच विजयी होत आले आहेत. मात्र, शिवसेना पक्षातील फुटीमुळे यंदा बुलढाणा मतदारसंघातील उमेदवारीचे समीकरण बदलले आहे. प्रतापराव जाधव सध्या शिंदे गटात असून यंदाची त्यांनी उमेदवारी निश्चित मानली जात आहे.(prataprao jadhao vs ravikant tupkar) त्यामुळे त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार? याकडे देखील अनेकांच्या नजरा लागून आहेत.

Latest Posts

Don't Miss