Monday, November 18, 2024

Latest Posts

मराठवाड्यात पहाटे भूकंपाचे धक्के

| TOR News Network | Earthquake In Marathwada : गुरूवारी पहाटे मराठवाड्यात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हिंगोलीमध्ये एकामागोमाग एक असे दोन भूकंपाचे धक्के बसले. १० मिनिटांच्या अंतराने झालेल्या या भूकंपामुळे नागरीक घाबरले आहेत.(Today Early Morning Earthquake In Marathwada)

भूकंपाचा पहिला झटका ६ वाजून ८ मिनिटांनी जाणवला. ४.५ रिश्टर स्केल एवढी त्याची तीव्रता होती. तर भूकंपाचा दुसरा झटका दहा मिनिटांनी ६ वाजून १९ मिनिटांच्या आसपास बसला. त्याची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी होती. हिंगोली व्यतिरिक्त नांदेड, परभणी येथेही काही ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गुरूवारी सकाळी मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. जमीन हादरू लागल्यामुळे अनेक नागरिक घाबरुन घराबाहेर आले. नांदेडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी मार्चच्या पहिल्या आठवड्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

 हिंगोली,परभणी, नांदेड मध्ये तीव्रता जाणवली

हिंगोलीमध्ये भूकंपाचे दोन धक्के जाणवले. पहिला धक्का ६ वाजून ८ मिनिटांनी तर भूकंपाचा दुसरा झटका ६ वाजून १९ मिनिटांच्या आसपास बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून याची तीव्रता हिंगोली परभणी नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांना या लोकांची तीव्रता जाणवली.(Hingoli,parbhani.nanded earthquake) सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान झालेल्या भूकंपामुळे अनेक घरांच्या भिंतीना छोट्या भेगा पडल्याची माहिती मिळत आहे.(Marathwada earthquake news) त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाला आहे.

Latest Posts

Don't Miss