Monday, November 18, 2024

Latest Posts

रोहित पवार यांची राज ठाकरेंना खुली ऑफर, म्हणालेत आज तुमची..

| TOR News Network | Rohit Pawar on Raj Thackeray : महायुतीमध्ये आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) समावेश होण्याची चिन्हे आहेत. महायुतीच्या अनेक नेत्यांनी येत्या ४८ तासांत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडेल, असे सूतोवाच केले होते. या सर्व घडामोडीवर शरद पवार गटाचे युवा आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रीया दिला आहे. त्यांनी थेट राज ठाकरे यांना खुली ऑफर दिला आहे. (Rohit Pawar Offer to Mns Raj Thackeray)

जेव्हा त्याची गरज नसते तेव्हा ते बाजूला करतात

राज ठाकरे आज दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे हे आमच्या विचाराचे आहेत. ते आले तर स्वागतच आहे असे जाहीर विधान केले होते. आमदार रोहित  म्हणाले, राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. त्यांनी थोडा विचार केला पाहिजे.भाजपला आज गरज आहे, त्यामुळेच ते सर्वांना महत्त्व देत आहेत. जेव्हा त्याची गरज नसते तेव्हा ते बाजूला करतात. हे लक्षात घेऊन राज ठाकरेंनी महाविकास आघाडीत सामील होऊन महाराष्ट्र धर्म पाळण्याचा प्रयत्न करावा.(Raj thackeray should join mahavikas aghadi)

महत्त्व दिले गेले नाही अशांना आता महत्व

रोहित पवार पुढे म्हणाले, उत्तर आणि दक्षिण भारतात एक राज्य आहे, ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो. जी संतांची भूमी आहे. चांगल्या व्यक्तिमत्वाच्या विचारांनी प्रेरित आहेत. इथे जनता आपल्यासोबत नाही, अशी भाजपची भावना आहे. (Janta not with Bjp) त्यामुळे भाजपला आता सर्व लहान-मोठ्या पक्षांना सोबत घेऊन मतांचे विभाजन करायचे आहे. सर्व पक्षांना एकत्र करणे शक्य असेल तर ते करू. 2019 मध्ये ज्या पक्षांना महत्त्व दिले गेले नाही अशा सर्वच पक्षांना महत्त्व दिले जात आहे.

त्यांनी महाविकास आघाडीसोबत यावे

मी देखील राज ठाकरे यांच्या भाषणांचा फॅन आहे. (I am fan of Raj thackrey speech) त्यांनी मविआ सोबत यावं ही आपली इच्छा आहे. भाजपसोबत जाण्याआधी त्यांनी विचार करावा. भाजपसोबत असलेल्या दोन पक्षांचा त्यांना फायदा दिसत नाही, म्हणून छोट्या पक्षांना सोबत घेत आहेत. महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.(Raj thackeray Should come with mahavikas aghadi)

राज ठाकरे अमित शाहांची भेटीला दिल्लीत 

त्यांची आठवण आता भाजपला झाली

महाराष्ट्रातील जनता भाजपसोबत नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. यामुळे भाजप लहान-लहान पक्षांना सोबत घेऊन मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन पक्ष फोडूनही या दोन्ही पक्षांचा काही उपयोग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. यामुळे ज्या पक्षांना पाच वर्षांपूर्वी महत्व दिले जात नव्हते, त्यांची आठवण आता भाजपला झाली आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Latest Posts

Don't Miss