vidhansabha election latest news : लोकसभा निवडणुकीबरोबर अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशा, आंध्र प्रदेश विधानसभेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभेच्या चार राज्यांचे मतमोजणी ४ जून रोजी ठेवली आहे. परंतु आयोगाने आता दोन राज्यांच्या मतमोजणी तारखांमध्ये बदल केला आहे. आता अरुणाचल प्रदेश, सिक्कीम येथील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या २ जून २०२४ रोजी होणार आहे.( in two state counting date changed) मतमोजणी तारखांमध्ये बदल का केला? याचे कारण आयोगाने दिले आहे. (Date change for vidhansabha election counting)
अरुणाचलमध्ये अशी आहे प्रक्रिया
अरुणाचल प्रदेशातील 60 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी तर मतदान होईल. त्यासाठी 20 मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 27 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर 28 मार्च रोजी अर्जांची छननी होणार आहे. 30 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येतील. मतमोजणी चार जून रोजी होणार होती. आता ती दोन जून रोजी होणार आहे.
सिक्किममध्ये अशी प्रक्रिया
सिक्किम विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. राज्यांत 32 विधानसभेच्या जागा आहेत. त्यासाठी अधिसूचना 20 मार्च काढण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज 27 मार्चपर्यंत दाखल करता येणार आहे. 28 मार्च रोजी छननी तर 30 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. आता या ठिकाणी दोन जून रोजी मतमोजणी होणार आहे.
म्हणून केला तारखेत बदल
अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन्ही राज्यांच्या विधानसभेच्या मतमोजणी तारखा बदलण्यात आल्या आहेत. कारण या दोन्ही विधानसभेचा कार्यकाळ २ जूनला पूर्ण होत आहे. यामुळे या ठिकाणी मतमोजणी दोन जूनपर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. या कारणामुळे निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यांत मतमोजणीच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला.