पूर्ण माहिती का दिली नाही ? असा सवाल करत व्यक्त केली नाराजी
Supreme Court On Electoral Bonds: आज सर्वोच्च न्यायालयात इलेक्ट्रॉनिक बॉन्ड संदर्भात पुन्हा सुनावणी पार पडली. मागच्या सुनावणीत इलेक्ट्रोल बॉडचा युनिक नंबर का दिला नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने एसबीआय़ला नोटीस पाठवली होती. आजच्या सुनावणीत पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला पूर्ण माहितीचा खुलासा करायला सांगितला होता, पूर्ण माहिती का दिली नाही ? असा सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे.(Supreme Court Slams SBI)
काय म्हणटलं सुप्रीम कोर्टाने
“तुम्हाला पूर्ण माहितीचा खुलासा करायला सांगितला होता. एसबीआयने पूर्ण माहिती का दिली नाही? तुम्हाला काय हव ते सांगा आम्ही तेवढीच माहिती ओपन करू अशी एसबीआयची वृत्ती दिसते, असे म्हणत तुम्ही फक्त कोर्टाच्या आदेशावर अवलंबून राहू नका, तुम्ही राजकीय पक्षाच्या युक्तीवाद करायला आलेले नाहीत, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने स्टेट बॅंकेकडून युक्तीवाद करणाऱ्या ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांना फटकारलं.
आम्हाला बदनाम करण्याचं काम केलं जातं आहे
यावर “आम्ही माहिती द्यायला तयार आहोत. मात्र आमची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने बाहेर रंगवली जात आहे. आम्हाला बदनाम करण्याचं काम केलं जातं आहे. माध्यमांच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्याबद्दल चुकीची माहिती दिली जात आहे,” असा युक्तीवाद हरिश साळवे यांनी केला.
एसबीआयचे चेअरमन यांना गुरुवारी म्हणजेच 21 मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी सर्व माहिती ECI laa द्यावी लागणार आहे. सोबतच याबाबतचे प्रतिज्ञापत्रही सुप्रीम कोर्टात सादर करावे लागणार आहे. SBI ला उपलब्ध सर्व तपशील द्यायला हवेत यात शंका नाही. आम्ही स्पष्ट करत आहोत की बाँड नंबर देखील नमूद करावा लागेल, असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.