Monday, November 18, 2024

Latest Posts

हा तर निवडणुका पुर्णपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न

| TOR News Network | Sanjay Raut Latest News : केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकांच्या आधी सेवानिवृत्त IAS अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीवरुन काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut on Election Commissioner)

आगामी निवडणुका पुर्णपणे ताब्यात घेण्याचा हा प्रयत्न आहे. जिंकण्याची खात्री नसल्यामुळे यंत्रणा ताब्यात घ्यायच्या असतील तर सर्वात आधी निवडणूक आयोग ताब्यात घ्यावा लागतो. त्यामुळेच आपल्या मर्जीतील लोकांना बसवले आहे. घटनात्मक पद्धतीने ही निवडणूक झालेली नाही,  असे संजय राऊत म्हणाले.

तसेच आचारसंहिता लागायच्या काही तास आधी मोदी सरकारने हे अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्याकडून या देशाच्या जनतेला कोणतीही विशेष अपेक्षा नाही, असे म्हणत संजय राऊतांनी नव्या निवडणूक आयुक्तांच्या निवडीवरुन भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला.

आम्हाला भाजपला पाडायचे आहे

महाविकास आघाडीमध्ये कोणी कोणाला पाडत नाही आम्हाला भाजपला पाडायचे आहे. प्रकाश आंबेडकर आणि आमच्यात काही चर्चा करणे गरजेचे आहे. तर आम्ही स्वतंत्रपणे करू. आम्ही कोणालाही एकमेकांना निमंत्रण घेऊन बोलवत नाही, महाविकास आघाडी हे कुटुंब आहे प्रत्येकाने कधीही येऊन त्या बैठकीत चर्चेत सामील होऊ शकता, असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

Latest Posts

Don't Miss