| TOR News Network | Jayant Patil on Modi : देशात लोकसभेच्या निवडणूका लागल्या आहेत.सत्ताधीरी प्रचार प्रसार करत मोदी गॅरंटी सांगून आपली विकास कामे दाखवण्यास सुरूवात केली आहे. मात्र त्यांची गॅरंटी आता चायनासारखी आहे. चले तो चांद तक नही तो शाम तक अशी स्थिती आहे. सामान्य माणसाने जागरुक राहिल पाहिजे. दिसत तसं नसतं, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष गटाचे नेते जयंत पाटील यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.(Ncp Leader Jayant Patil Slams on Modi guarantee)
नाशिकच्या चांदवड येथे राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा होत आहे. या ठिकाणी आलेल्या शेकऱ्यांनी शेतमालाला भाव मिळावा या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. येथे महाविकास आघाडीतील अनेक नेते उपस्थित आहेत. यावेळी जयंत पाटलांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर टीका केलीये.
देशात शेतकरी अस्वस्थ आहे. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर जाऊन बसलेत. आमच्या मालाला आधारभूत किंमत द्या अशी मागणी शेतकरी करत आहेत. कांद्याला भाव नाही. निर्यातबंदी उठविण्याची दानत या सरकारमध्ये नाही. सोयाबीन, कापूस यांना भाव मागणारे आता गप्प आहेत, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
राज्यातील शेतकरी आज अडचणीत
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील यावेळी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. देश आणि राज्यात शेतकरी अडचणीत आहे, यासाठी भाजपाची विचारप्रणाली जबाबदार आहे.(Farmers are in trouble in the state) राहुल गांधींनी या यात्रेत काही भूमिका घेतली आहे. युवकांना, महिलांना आणि शेतकऱ्यांना ते आज खरी गॅरंटी देणार आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हीच मोदींची गॅरंटी
२०१४ नंतर केवळ उद्योगपतींसाठी निर्णय
२००४ ते २०१४ च्या काळात घेतलेले निर्णय आपण आठवले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत. २०१४ नंतर केवळ उद्योगपतींसाठी निर्णय घेतले गेले.(After 2014 decision only for industrialists) मात्र ज्या भागात दुष्काळ आहे तेथे सरकारचं लक्ष नाही. कांद्याचे प्रश्न सुटावेत यासाठी राहुल गांधी आज जनतेशी संवाद साधतील, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.