| TOR News Network | Eknath Khadse Latest News : भविष्यात माझा भाजपमध्ये जाण्याचा विचार झाला तरी मी स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करील, तसेच रावेर लोकसभासाठी सूनबाई रक्षा खडसे यांच्या उमेदवारीविषयी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी चर्चेला पूर्णविराम दिला व भूमिका स्पष्ट केली. तसेच लोकसभेच्या निवडणूक संदर्भात स्व:तीची इच्छा त्यांनी बोलून दाखवली.(Eknath Khadse On Raksha Khadse)
राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप रखडलेलं आहे. असे असताना मतदारसंघावर दावे प्रतिदावे सांगण्यास कधीचीच सुरूवात झाली आहे. जळगाव आणि रावेर कोण लढवणार? महाविकास आघाडीत या जागा कोणाच्या वाट्याला जाणार, अशा मुद्द्यांवर आयोजित पत्रकार परिषदेत शरदचंद्र पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
खडसेंनी सूनबाईंना विचारलं
रावेर मतदारसंघात शरदचंद्र पवार गट उमेदवार देणार आहे.(Raver Loksabha) या जागेसाठी रक्षा खडसे यांना मी स्वत: राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेणार का? असा प्रश्न विचारला. मात्र यावर खासदार रक्षा खडसे यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. (Raksha khadse refuse offer of ncp) मी मरेपर्यंत भारतीय जनता पक्षातच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.(Till my Death will Be in BJP) त्यामुळे खासदार रक्षा खडसे या राष्ट्रवादीकडून उमेदवार असू शकत नाही, असे खडसे यांनी सांगितले.
माझीही लढण्याची इच्छा
रावेरची जागा ही शरदचंद्र पवार गटाला सोडण्यात आली असल्याचे महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले आहे. (Raver loksabha seat for sharad pawar ncp)मात्र अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी रावेर लोकसभा पूर्ण ताकदनिशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट लढवणार आहे. इच्छुक उमेदवारांची यादी वरिष्ठ पातळीवर पोहोचलेली आहे. चार ते पाच उमेदवार इच्छुक आहेत. मी स्वत:ही रावेरमधून एक दावेदार असून अंतिम निर्णय पक्ष घेईल, असे खडसे म्हणाले.
पक्षाच्या उमेदवाराचं काम करेन
आधीच माझे हृदयाचे ऑपरेशन झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि शरद पवार साहेबांची चर्चा करूनच निवडणूक लढविण्यासंदर्भात मी निर्णय घेईन.माझी तब्येत चांगली नसली तरी पक्षाने माझ्या उमेदवारीचा विचार करावा, अशी इच्छाही एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे. एकदा तरी खासदार व्हावे अशी माझी इच्छा आहे. परंतु जरी पक्षाने मला उमेदवारी दिली नाही तरी पक्ष जो उमेदवार देईल त्याला विजयी करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल, अशी ग्वाही खडसेंनी दिली.