| TOR News Network | Bjp Cm On Central Leadership : देशात सीएए कायदा लागू झाला आहे.याचे भाजपकडून समर्थन होत आहे तर दुसरीकडे विरोधक या कायद्याला विरोध करत आहेत.असे असताना आता एका भाजपच्याच मुख्यमंत्र्यांनी थेट केंद्रातील नेतृत्वाला खडेबोल सुनवले आहेत. त्यांनी आपला राजीनामा देण्याची धमकी दिली आहे.(Bjp Cm to Resign On CAA Law)
एनआरसीसाठी ज्या व्यक्तींनी अर्ज केलेला नाही अशा एकाही व्यक्तीला जरी भारतीय नागरिकत्व मिळाले तर राजीनामा देऊ, असा इशाराच आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी केंद्रीय नेतृत्वाला दिलाय. सीएए विरोधात आसाममध्ये विरोधी पक्षांची निदर्शने सुरु आहेत. अशावेळी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी हे विधान केले आहे. (Himanta Biswa Sarma warning) त्यामुळे राज्यात याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आसाममधील विरोधी पक्षांनी नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा (CAA)-2019 च्या अंमलबजावणीवरून भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका करत राज्यात CAA विरोधात निदर्शने सुरू केली आहेत. (Biswa criticize on Central Leadership)
अर्ज न करणाऱ्याला नागरिकत्व मिळाल्यास राजीनामा
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी मात्र CAA वरून वेगळी भूमिका घेतली आहे. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (NRC) साठी अर्ज न करणाऱ्याला नागरिकत्व मिळाल्यास राजीनामा देणारे आपण पहिले व्यक्ती असू असे ते म्हणाले.(Biswa will Resign from Cm) नागरिकत्व (सुधारणा) कायदा, 2019 नुसार गैर मुस्लिम स्थलांतरितांना (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील लोक) जे 31 डिसेंबर 2014 पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आले होते त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
राज्यात लाखो लोकांचा प्रवेश होईल
हिमंत बिस्वा सरमा पुढे म्हणाले, ‘मी आसामचा मुलगा आहे. एनआरसीसाठी अर्ज न केलेल्या एका व्यक्तीलाही नागरिकत्व मिळाले, तर मी सर्वप्रथम राजीनामा देईन. CAA लागू झाल्यास राज्यात लाखो लोकांचा प्रवेश होईल. असे झाल्यास सर्वप्रथम मीच आंदोलन करेन. CAA मध्ये नवीन काही नाही. (Nothing New In CAA Law)कारण, ते पूर्वी लागू केले गेले होते. त्यामुळे आता पोर्टलवर अर्ज करण्याची वेळ आली आहे. पोर्टलवरील डेटावरून या कायद्याला विरोध करणाऱ्यांचे दावे खरे आहेत की खोटे हे स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले.