Monday, November 18, 2024

Latest Posts

दहा तासांच्या ईडी चौकशीनंतर हिरानंदानी म्हणाले…

| TOR News Network | ED investigation of Hiranandani : मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात नावाजलेले नाव म्हणजे हिरानंदानी समूह. मात्र एका प्रकरणात ईडीने उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांची दहा तासांपेक्षाही अधिक काळ चौकशी केली. सोमवारी सकाळी 11.30 वाजल्यापासून त्यांना चौकशीसाठी सुरू झाली ते आता रात्री 10.30 वाजता चौकशी संपली आहे. फेमा (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट) च्या उल्लंघनाच्या चौकशीसंदर्भात हजर झाले होते.(More Than 10 hours ED Enquiry Of niranjan Hiranandani)

मुंबईतीलसह इतर ठिकाणी शोधमोहीम

फेमा (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट) च्या उल्लंघनाच्या चौकशीसंदर्भात हजर झाले.(Foreign Exchange Management Act) गेल्या महिन्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी निरंजन हिरानंदानी आणि दर्शन हिरानंदानी यांच्या मुंबईतील परिसर आणि इतर काही ठिकाणी शोधमोहीम राबवली होती.(Niranjan and darshan Hiranandani ) यानंतर दोघांनाही या प्रकरणातील जबाब नोंदवण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आलं होतं.

देशभरात 25 ठिकाणांवर छापे

महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये रिअल इस्टेट प्रकल्प असलेल्या हिरानंदानी समूहाच्या कंपन्यांना एफडीआय (परकीय थेट गुंतवणूक) म्हणून 400 कोटी रुपये मिळाले. या रकमेचा वापर विहित सरकारी निर्देशानुसार झाला नसल्याचाही आरोप आहे.  आयकर विभागाने मार्च 2022 मध्ये मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई या तीन शहरांमध्ये पसरलेल्या हिरानंदानी ग्रुपच्या जवळपास 25 ठिकाणांवर छापे टाकले होते.

ईडीची केजरीवालांच्या पर्सनल सेक्रेटरीसह १२ नेत्यांच्या घरी छापेमारी 

रात्री उशिरा चौकशी झाल्यावर निरंजन हिरानंदानी आम्ही चौकशीला सहकार्य केलं असून ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या असंख्य प्रश्नांना मी उत्तर दिली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Latest Posts

Don't Miss