Monday, November 18, 2024

Latest Posts

मुख्यमंत्री म्हणाले ये अंदर की बात है, हे सगळे ठरलेले होतं

शिंदे-पटोले यांच्यात कोपरखळ्या व मिश्किल टिप्पणी

Eknath Shinde To Nana Patole : विधानसभेत विरोधकांनी २९३ चा प्रस्ताव मांडला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली.यावेळी शिंदे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात कोपरखळ्या आणि मिशि्कल टिप्पणीमुळे सभागृहात एकच हशा पिकला.नानांनाही मी त्यांचा मुख्यमंत्री वाटतो,ये अंदर की बात है म्हणत मुख्यमंत्री यांनी सभागृह दणाणून सोडले.(Cm Eknat Shinde In House Makes Laughter)

राज्यातील शेतकरी कोमात गेल्याचे वक्तव्य करून विरोधकांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. खरेतर, राज्यातील विरोधकच कोमात गेले आहेत. त्यामुळे दरवेळी त्यांच्याकडून एकच स्क्रिप्ट वाचली जात आहे,’’ अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. यावेळी त्यांनी विरोधकांसह ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल केला.

हे आता बंद करा….

ते म्हणाले,‘‘अंतरिम अर्थसंकल्प असतानाही सर्व घटकांना न्याय दिला आहे. शेतकरी, गोरगरीब, महिला, युवक या सर्वांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. मात्र त्याचा अभ्यास न करताच विरोधकांकडून टीका केली जात आहे. किमान कधीतरी चांगल्या गोष्टीला चांगले म्हणायला शिकले पाहिजे. विरोधकांकडे बोलण्यासारखे काही नाही. त्यामुळे ऊठसूट चहापानावर बहिष्कार टाकायचा, एकाच विषयावर चर्चा करायची, मुद्दे सोडून गुद्यावर यायचे, पक्ष आणि चिन्ह चोरले म्हणून ओरडत फिरायचे; हे आता बंद करा.’’

आमदारकी वाचवण्यासाठी हजेरी लावतात

अधिवेशनात काही लोक आमदारकी वाचवण्यासाठी मध्येच सभागृहात हजेरी लावतात, असा टोलाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. सभागृहात ऑनलाइन उपस्थित राहता येत नाही, म्हणूनच ते येतात; नाहीतर त्यांनी घरातून उपस्थिती लावली असती, अशी टिपणीही त्यांनी केली.

आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,‘‘विरोधकांना शेतकऱ्यांशी देणेघेणे नाही. त्यांनी केवळ पोकळ घोषणा केल्या. आम्ही केलेल्या घोषणा पूर्ण केल्या.(We have fulfilled our announcements) असे असताना विरोधकांनी ‘शेतकरी कोमात आहे’, अशी टीका केली. ही भाषा योग्य नाही. शेतकऱ्यांचा हा अपमान आहे. आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, तर तुम्ही तोंडाला पाने पुसली. तुम्ही प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार दिले नाही. आम्ही मात्र ते खात्यावर जमा केले.’’

नानांनाही मी त्यांचा मुख्यमंत्री वाटतो

मुख्यमंत्री शिंदे यांनी, आपण स्वत:ला ‘सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाहीतर कॉमन मॅन’ समजतो. यावर मागून शंभूराज देसाई यांनी ‘नानांना नाही पटलं हे’, असा टोला लगावला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी, ‘नानांनाही मी त्यांचा मुख्यमंत्री वाटतो’ असल्याची टिपणी केली. (Even Nana thinks I am their Chief Minister) मुख्यमंत्री शिंदे यांच्या या विधानावर समोर बसलेल्या नाना पटोलेंनी ‘ते माझ्यामुळे मुख्यमंत्री झाले’, अशी कोपरखळी मारताच मोठा हशा पिकला. तर यापुढे जाऊन शिंदे यांनी, ‘हे खरं आहे. विजयराव (विजय वडेट्टीवार), ये अंदर की बात है, हे सगळे ठरलेले होते’, अशी मिश्किल टिप्पणी करताच सभागृहात पुन्हा हशा पिकला. (There was laughter in House)

अजूनही पुढे बरेच काही होणार

‘‘देशाला मोदींची गँरटी आहे. म्हणूनच अजित पवार इकडे आले, अशोक चव्हाणही आले. अजूनही पुढे बरेच काही होणार आहे,’’ असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी नाना पटोले यांनी डिवचले. यावर, ‘येणार असतील तर घ्या,’ असे पटोले म्हणताच ‘तुम्हाला सगळं खाली झालं तरी चालेल,’ असा टोला शिंदे यांनी लगावला.

Cm Eknath Shinde And Nana Patole in House

Latest Posts

Don't Miss