खासदार संजय राऊत यांची घराणे शाहीवर बॅटिंग
| TOR News Network | Sanjay Raut Media Brief Today : खासदार संजय राऊत यांनी आज घराणे शाहीवर गृहमंत्रा अमित शहा यांना चांगलेच धारेवर धरले. प्रसार माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले इंडिया आघाडीमध्ये घराणेशाही आहे, हा अमित शाहांचा आरोप हास्यास्पद आहे. घराणेशाही तर भाजपानेच पोसली. जय शाहांना बीसीसीआयचं अध्यक्ष कोणत्या आधारे केलं ? अमित शाह गृहमंत्री नसते तर जय शाह बीसीसीआयमध्ये दिसले तरी असते का ? असा सवाल विचारत संजय राऊत यांनी अमित शाहांवर टीका केली. (Sanjay Raut On Amit Shah)
संजय राऊत म्हणाले घराणेशाहीची गोष्ट करता, जय शहा आपल्या घराण्याचे नाहीत का. जय शहा आपले चिरंजीव आहेत. ते गृहमंत्र्यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे ते भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर ठोकल्या की सचिनेपक्षा जास्त शतकं आहेत त्यांची ? की कपिल देव यांच्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या त्यांनी ? असा सवाल राऊत यांनी विचारला. (Did Jay Shah Have More Centuries Than Sachin tendulkar) कोणाच्या घराणेशाहीवर आपण बोलतायत, ठाकरे आणि पवारांची घराणेशाही देशाला आणि समाजाला कायम निर्णयदायी दिशा देणारी आहे, इथे कोणाला मुख्यमंत्री बनायचं नाही. माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांना प्रधानमंत्री व्हायचं आहे पण मी अजून सांगतो नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत. सत्तेचा सारीपाट तुमच्या इशारावर चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
घराण्यांचे लाभार्थी मोदी आणि शहा सुद्धा आहेत
घराणेशाही तेव्हा म्हटली जाते जेव्हा घराण्याला प्रतिष्ठा असते. या देशातील काही घरांना प्रतिष्ठा आहे. त्यातील एक ठाकरे घराण्याला, या देशात शरद पवारांच्या घराण्याला देखील प्रतिष्ठा आहे कारण या दोन्ही घराण्यांनी देशाला, महाराष्ट्राला, समाजाला खुप काही दिलं आहे. ठाकरे घराण्याला प्रतिष्ठा आहे. ठाकरे कुटुंब काही आकाशातून पडलं नाही. महाराष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी ठाकरे कुटुंबांचं मोठं योगदान आहे. या घराण्यांचे लाभार्थी नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा आहेत हे त्यांनी आपल्या मनाला विचाराव, बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे.त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षाने वारंवार घेतलेला आहे.
सरकारची गुप्त माहिती सांगतो ते गोळ्या झाडण्याच्या तयारीत
मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं ….
बाळासाहेब ठाकरे जर नसते तर भारतीय जनता पार्टी राज्यात औषधालाही दिसला नसता, बाळासाहेबांचा आणि त्यांच्या घराण्याचं बोट धरून राज्यात भाजप पक्ष वाढलेला आहे.(Big Role Of Balasaheb to Grow BJP) मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतं. घराणेशाहीवाले सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेत’, अशी टीका गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.