| TOR News Network | Mumbai Budget Session 2024 : मुंबईला आजपासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेले दिसले.राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन त्यांना विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यामध्ये दोन्ही विरोधीपक्ष नेत्यांनी सहभाग घेतला. यामध्ये सरकारविरोधात घोणबाजी करण्यात आली. (Opposition aggressive on law and order issue)
गेली ती शिवशाही, आली ती गुंडशाही
‘गेली ती शिवशाही, आली ती गुंडशाही’, महाराष्ट्राचा कल्लू मामा कोण?, ‘शासन आपल्या दारी गोळीबार घरोघरी’, ‘गुंडांना पोसणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो’ असे फलक हातात घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरेंच्या आमदारांनी घोषणाबाजी केली.
हातात नकली बंदुका….
दरम्यान, विरोधकांनी यावेळी विधानभवन परिसरात नकली पिस्तूलं घेऊन आले होते. सरकारविरोधात घोषणाबाजी करताना ही पिस्तुलं रोखून त्यांनी राज्यात एकामागून एक झालेल्या गोळीबारांच्या घटनांकडं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तसेच बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेसाठी सरकारचा धिक्कार केला.
अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगेवर कडाडले
लोकांना त्याचा फायदा होऊ द्या
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, “तुम्ही खर्च करा लोकांपर्यंत योजना जाऊ द्या, लोकांना त्याचा फायदा होऊ द्या. नाहीतर तुम्ही केवळ बातम्या करण्यासाठी बजेट मांडणार आणि नंतर लोकांना त्याचा काहीच फायदा होणार नसले तर ते योग्य नाही, अशा पद्धतीचा मुद्दा आम्ही मांडणार आहोत”