| TOR News Network | Devendra Fadnavis in Budget Assembly 2024: आजपासून मुंबईत अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरुवात झाली.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करा अशी मागणी केली. ती अध्यक्षांनी मंजूर देखील केली.या सर्व प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभागृहात भाष्य केले. (Maharashtra Budget Session 2024)
विधानसभेत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार प्रतिसाद उमटले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या मागे कोण आहे? त्याची सर्व सखोल चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी एक, एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत. चौकशीतून सर्व समोर येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Devendra Fadnavis on Budget 2024)
याचा शोध घेतला जाणार आहे
देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, रात्री जाऊन मनोज जरांगे यांना परत आणणारे कोण आहेत. कोणाकडे बैठक झाली हे आरोपी सांगत आहेत. आरोपींनी जबाबात सांगितले की, आम्हाला दगडफेक करा, असे सांगितले. ज्या पोलिसांववर दगडफेक झाली ते पोलीस आपले नाही का? आपल्या पोलिसांना मारायचे आणि आपण शांत बसायचे का? आतापर्यंत मराठा समाजाचे मोर्च शांततेत झाले. परंतु बीडमध्ये हिंसक आंदोलन झाले. त्यामागे कोण आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.
एक एक गोष्टी बाहेर येत आहे
फडणवीस म्हणाले की, राजकारण आपल्या स्तरावर चालत राहणार आहे. पण आज समाजाला विघटन करण्याचे काम चालले. जरांगे यांचे कोणासोबत फोटो निघत आहे. कोणाच्या पैसा त्याच्यामागे आहे. यासंदर्भात एक एक गोष्टी बाहेर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात आणि तुम्ही कोणाची आयामाय काढणार असेल तर कसे चालणार.(who’s money behind jarange patil)
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार
आता ती स्क्रीप्ट जरांगे बोलत आहे
अध्यक्षांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यानुसार आता चौकशी होणार आहे. माझी जरांगे यांच्यासंदर्भात तक्रार नाही. पण जरांगे यांच्या पाठीमागे बोलवतो धनी कोण आहे, ही स्क्रीप्ट काही लोक रोज बोलतात. आता ती स्क्रीप्ट जरांगे बोलत आहे. संभाजीनगर, पुणे, मुंबईत वॉर रुम कोणी उघडली. ही सर्व माहिती मिळू लागली आहे. सर्व चौकशी करुन हे षडयंत्र बाहेर आणू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.