| TOR News Network |
Kashish Baghat latest News : सरदार पटेल स्पोर्ट्स सिटी, गुजरात विद्यापीठ, नवरंगपुरा अहमदाबाद (गुजरात) येथे भारतीय अॅथलेटीक्स महासंघाच्या अधिपत्याखाली, गुजरात राज्य अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या १९ व्या आंतर-जिल्हा राष्ट्रीय अॅथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेत नागपूर जिल्हा संघाची कर्णधार कशीश भगतने ६०० मीटर धावण्यात रौप्यपदक प्राप्त करीत दमदार यश प्राप्त केले.(Inter-District National Athletics Championship)
स्पर्धेत १६ वर्षांखालील मुलींच्या गटात ६०० मीटर धावण्यात नागपूर जिल्ह्याच्या कशीश भगतने दुसऱ्या स्थानासह रौप्यपदक प्राप्त केले. (Kashish bhagat won silver medal) कशीशने १ मि. ३६.३० अशी वेळ नोंदविली. प्रथम स्थान हरयाणाच्या तन्नूने १ मि. ३५.७४ अशी वेळ देत सुवर्ण तर कांस्यपदक मथुराच्या रंजनने प्राप्त केले. मागील वर्षी पाटणा, बिहार येथे झालेल्या याच स्पर्धेत कशीशने रौप्यपदक प्राप्त केले होते. महात्मा गांधी इंग्लिश मिडीयम शाळेची इयत्ता दहावीची विद्यार्थीनी असलेली कशीश क्रीडा शिक्षक रामचंद्र वाणी आणि गजानन ठाकरे यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करते.(Sports teacher Ramchandra Vani)
स्पर्धेत १६ वर्षांखालील मुलांच्या गटात गोळाफेकमध्ये यश भुतेने १२.९८ अशी वेळ देत सातवे स्थान तर ट्रायथ्लॉन बी मध्ये पृथा गोडबोलेने २०५२ गुणांसह ३१ वे स्थान मिळविले. खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल नागपूर जिल्हा अॅथलेटीक्स संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी यांनी समाधान व्यक्त केले. (Dr. Sharad Suryavanshi )संघटनेचे अध्यक्ष गुरुदेव नगराळे, सभापती उमेश नायडू, उपाध्यक्ष नागेश सहारे, सहसचिव द्वय रामचंद्र वाणी, अर्चना कोट्टेवार, एस. जे. अँथोनी, डॉ. संजय चौधरी, डॉ. विबेकानंद सिंग, जितेंद्र घोरदडेकर, गौरव मिरासे, गजानन ठाकरे, गणेश वाणी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.