आता दोसर वैश्य आणि प्रजापती नगर मेट्रो स्टेशन येथून मेट्रो शेअर ऑटो रिक्षा सेवा सुरु
| TOR News Network | | Now Nagpur Metro Share Auto Rikshaw | नागपूर: फिडर सेवेन्तर्गत फर्स्ट माईल आणि लास्ट माईल कनेक्टिविटीच्या तत्वांतर्गत महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन तर्फे मेट्रो स्टेशनपर्यंत आणि स्टेशनपासून गंतव्य स्थानापर्यंत प्रवाशांना पोहचवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणजे शेयर्ड ऑटो रिक्षा सेवा,नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत हि सेवा सर्वात पहिले कस्तुरचंद पार्क स्टेशन येतेच सुरु झाली होती, आता त्या पाठोपाठ दोसर वैश्य आणि प्रजापती नगर मेट्रो स्टेशन येथून हि सेवा सुरु झाली आहे.
महा मेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) श्री अनिल कोकाटे, महा व्यवस्थापक (संचालन) श्री सुधाकर उराडे, श्री सहायक प्रादेशिक परिवहन आयुक्त (शहर) श्री रवींद्र भुयार, सहायक प्रादेशिक परिवहन आयुक्त (पूर्व) श्री तुषार हटवार, नागपूर ऑटो संघटनांचे अध्यक्ष श्री जीवन तायवाडे, श्री विलास भालेकर, श्री देवव्रत विश्वास, महा मेट्रोचे अधिकारी तसेच ऑटो संघटनेचे इतर पदाधिकार्यांनी हिरवा झेंडा दाखवत हि सेवा सुरु केली.
शेयर्ड ऑटो सेवेची हि संकल्पना अनोखी असून सध्या तीन स्थानकावरून सुरु असलेली हि सेवा टप्प्या-टप्प्याने उर्वरित मेट्रोच्या स्थानकावरून देखील सुरु होणार आहे. शेयर ऑटोरिक्षा सेवेचे दर निश्चित असून प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणने (Regional Transport Authority) ते मंजूर केले आहेत. ही संकल्पना केवळ मेट्रोने प्रवास करणे सोपे करणार नाही, तर नागपूरकरांसाठी एक मोठा गेम चेंजर ठरेल कारण ती फीडर सेवा प्रदान करून आवश्यक ठिकाणे जोडेल.
शहरातील विविध ऑटो रिक्षा संघटनांशी सल्ला-मसलत करून हि सेवा सुरु झाली आहे. सदर मेट्रो शेअर ऑटो रिक्षा सेवा सुरु करण्याकरता प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर पोलीस वाहतूक शाखा आणि ऑटो रिक्षा संघटनांनी मोलाची मदत केली.