Sunday, November 17, 2024

Latest Posts

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकीत येवढे आमदार होते गैरहजर

| TOR News Network | Congress Mla Latest News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीना दिल्यानंतर कोणते आमदार त्यांच्या सोबत जातील यासाठी काँग्रेस पक्षाने चाचपणी केली. अशोक चव्हाण यांच्या सोबत १५ आमदार भाजपा मध्ये जातील अशी चर्चा रंगली होता. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली.या बैठकीला अनेक आमदार गैरहजर असल्याची माहिती समोर येत आहे.(Many Mla Absent in congress meeting)

काही आमदारांना आपण गैरहजर राहण्याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कळवलं आहे. (Nana patole meeting at mumbai with all mla )तर काही काही आमदार नॉट रिचेबल आहेत. काँग्रेसचे ४५ आमदारांपैकी ७ आमदार गैरहजर आहेत. (Total 7 Mla Absent)

नाना पटोले म्हणाले

काँग्रेस आमदारांबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. काँग्रेसचं लोणावळा येथे दोन दिवसीय शिबीर आहे. अशातच राज्यसभेची निवडणूक प्रक्रियेचा फॉर्म भरणे आहे. त्यानंतर आम्ही जाणार आहोत. अनुपस्थित राहणाऱ्या आमदारांनी न येण्याबाबतची कारणे आम्हाला कळवली आहेत. (Congress mla confirm for Absent says nana patole)मी आणि बाळासाहेब थोरात यांचं सर्वांशी बोलणं झालं आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं.

नाना पटोले यांनी सांगितला काँग्रेसच्या स्थापना दिवसामागचा अजेंडा

कोणते आमदार होते गैरहजर

  • मोहनराव हंबर्डे हे अशोक चव्हाण समर्थक आहेत. हंबर्डेंच्या घरी लग्नकार्य आहे त्यामुळे ते बैठकील येणार नाहीत अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
  • माधवराव जवळगेकर हे देखील अशोक चव्हाण समर्थक आहेत. तेही वैयक्तिक कारणामुळे बैठकीला येणार नाहीत, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
  • जितेश अंतापुरकर हेही अशोक चव्हाण समर्थक आहेत. ते देखील आलेले नाहीत.
  • अमित देशमुख देशमुख देखील बैठकीला पोहोचले नाहीत.
  • केसी पाडवी देखील बैठकीला आलेले नाहीत. ते देखील लग्नकार्यामुळे येणार नसल्याची माहिती आहे.
  • संग्राम थोपटे आणि सुलभा खोडके हे देखील वैयक्तिक कारणामुळे बैठकीला येणार नाहीत.

Latest Posts

Don't Miss