फडणवीसांच्या उपस्थितीत अधिकृपणे केला भाजपात प्रवेश
| TOR News Network | Ashok Chavan Officially Joins BJP : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी अधिकृत पणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अशोक चव्हाण यांचे विश्वासू माजी आमदार राजूरकर आदी भाजप नेते उपस्थित होते. (Ashok Chavan Now In Bjp)
अशोक चव्हाण हे भाजपात प्रवेश करतील आशा चर्चा गेल्या दोन वर्षांपासून रंगत होत्या. तसेच त्यांच्या सोबत 11 आमदारही भाजपात प्रवेश करीतील असे बोल्ले जात होते. मात्र अखेर तो दिवस उगवला अशोक चव्हाण यांनी सर्व चर्चांना पूर्ण विराम देत आज अधिकृत भाजपात प्रवेश केला. (In Presence Of Fadnavis Bawankule Ashok chavan Joins Bjp in mumbai)
तर दुसरीकडे काँग्रेसने डॅमेज कंट्रोलसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.काँग्रेस हायकमांडने राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदारांना देखील हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला देखील मुंबईत दाखल झाले आहेत. सध्या काँग्रेसोबत किती आमदार चव्हाण यांच्या संपर्कात आहेत, हे स्पष्ट करण्यासाठीच ही बैठक बोलावली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
या कारणांच्या शक्यतेमुळे अशोक चव्हाणांनी सोडला काँग्रेसचा हात
त्या खटल्यांचे काय होणार
अशोक चव्हाण यांचे तीन प्रकरणांसध्ये नाव आहे.मात्र त्याची तात्पूर्ती चौकशी थांबवून ठेवण्यात आली आहे.पहिले प्रकरण आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेशी संबंधित असून या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.तर दुसरे प्रकरण म्हणजे यवतमाळमध्ये चव्हाण यांच्यासह १५ जणांवर जमीन हडप केल्याचा गुन्हा दाखल आहे. याची पुढील चौकशी थांबलेली आहे.तर तिसऱ्या प्रकरणात सक्तवसुली संचलनालय त्यांची चौकशी करीत आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये त्याला स्थगिती दिलीय.त्यामुळे आता भाजपात गेल्याने या तीन्ही प्रकरणाचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.