| TOR News Network | Maharashtra Congress Latest News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या आहेत.महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी महेश चेन्नीथला यांनी आज एक महत्वाची बैठक बोलावली आहे. पक्षात बदलाचे संकेत या बैठकीतून मिळण्याचे बोल्ले जात आहे. (Congress Big Change in Maharashtra)
विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज या बद्दल माहिती दिली. तसेच आपल्या काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.ते म्हणालेत आज पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून मुंबईत सर्व काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली आहे, पक्षामध्ये बदल होत आहेत. (Congress Meeting today) पण मी काँग्रेससोबत असून भविष्यातही काँग्रेसमध्येच असेल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. (After ashok chavan resignation Congress in Action)
मी विधानसभेच्या चार निवडणुका काँग्रेसच्या चिन्हावर जिंकल्या आहेत, तसेच मंत्रीही झालो. तसंच दोनदा विरोधीपक्ष नेताही झालो. आता मला पक्षाकडून अधिक काही अपेक्षित नाही. त्यामुळं मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहिल याची खात्री देतो, असं वडेट्टीवार यांनी आपण काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. (I will be with congress Says Vijay Wadettivar)
आमदारांना एकत्र ठेवणार
दरम्यान, आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार असून उद्या सर्व आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती देखील वडेट्टीवार यांनी दिली आहे. (All Congress Mla Meeting Today) या बैठकीसाठी सर्व आमदारांना हजर राहणं बंधनकारक असणार आहे. आमदरांना एकत्र ठेवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.(Congress All Mla Will Be Kept Together) अशोक चव्हाण यांच्यानंतर इतर किमान १५ आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा काल रंगल्या होत्या. पण नंतर ज्या कथित आमदारांची नाव समोर येत होती, त्या आमदारांनी आपण काँग्रेससोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.