| TOR News Network | Jarange Patil Andolan : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील परत एकदा अंतरवलीत उपोषणावर बसले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगेसोयरेंबाबत अधिसूचनेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी ही त्यांची मागणी आहे.त्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकृतीही खालावली आहे. तसेच उपचार घ्यायला त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. (Manoj Jarange Patil refused for Health treatment)
पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे म्हणाले, “15 तारखेला अधिवेशन घेतलं नाही, तसंच सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही आणि हैदराबाद गॅझेट घेतलं नाही तर या महाराष्ट्रात काय होतंय त्यांच्या लक्षात येणार नाही. त्यांनी टप्पे पाडलेत तर मग आम्ही पण टप्पे पाडलेलेच आहेत ना आंदोलनाचे. आम्ही काय दाखवू हे सरकारला चांगलचं माहिती आहे. १५ तारखेच्या अधिवेशनात जर अंमलबजावणी केली नाही तर मराठे पुन्हा मुंबईला जातील की आणखी कुठे जातील हे मी आत्ताच सांगत नाही, त्यांना लवकरच कळेल”(Jarange Patil Warns Maha Govt)
आता देश पोतळीवर आंदोलन करणार
१५ तारखेला अमित शहा संभाजीनगरला येत आहेत. पण आम्ही कशासाठी त्यांची भेट घ्यायची त्यांनी येऊन आमची भेट घ्यावी. त्यांना आम्ही यापूर्वी खूप विनंती केल्या आहेत. त्यांनी लक्ष दिलेलं नाही मग ते कोणीही असू द्या. त्यांना परत हिंडायला लावायला आम्ही खंबीर आहोत. आता आम्ही १४ राज्यात एकत्र यायला लागलो आहोत. (We Are All One In 14 States) मग त्यांना दाखवतो कचका काय असतो. यानंतर आता देशात आंदोलन होईल, कारण आम्ही चौदा राज्यात एकत्र येत आहोत, असंही यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.(Now Maratha Andolan At National Level)
मनोज जरांगे पाटील परत उपोषणावर बसणार
जीवालाही बरेवाईट होऊ शकते
जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी रविवारी अंबडचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भीमराव दोडके आंतरवाली सराटीत उपोषण स्थळी तपासण्यासाठी आले होते. परंतू मनोज जरांगे यांनी तपासणी करुन घेण्यास नकार दिला आहे. डॉ.भीमराव दोडके यांनी सांगितले की पोटात अन्न न गेल्याने माणूस अंथरुणावर पडून राहतो. त्याचे वजन कमी होते. शुगर कमी होते. जीवालाही बरेवाईट होऊ शकते अशीही माहीती दोडके यांनी दिली. जरांगे यांनी तपासण्याची परवानगी दिली असती तर प्रकृतीचे निदान नीट करता आले असते असेही त्यांनी सांगितले.