Sunday, November 17, 2024

Latest Posts

बजेटची होळी करीत सिटूने नोंदवला मोदी सरकारच्या अंतरिम बजेटचा निषेध

| TOR News Network | CITU Protested On The Interim Budget 2024 |नागपूर| : केंन्द्र सरकारने निवडणूक पूर्वी जे अंतरिम बजेट सादर केले ते पुन्हा एकदा कामगार -शेतकरी – सर्व सामान्य जनतेवर बोझा लादणारे असून कॉर्पोरेट क्षेत्राला करांमध्ये सुट देणारे असून महागाई व बेरोजगारी वाढविणारे बजेट असल्यामुळे सिटूच्या आवाहना नुसार अंगणवाडी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र व सिटू जिल्हा कमिटीच्या तर्फे संविधान चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली व बजेटची होळी करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना अरुण लाटकर, किसान सभेचे नेते व माकपाचे नागपूर जिल्हा सचिव यांनी केंन्द्राच्या बजेट बाबत विस्तृत मांडणी केली असून त्यांनी सांगीतले की, केंन्द्र सरकारने सर्व ज्या योजना आहेत मनरेगा, एकात्मिक महिला व बाल विकास योजना, आशा व इतर योजना हयावरील खर्चात जबरदस्त कपात केली आहे. अंगणवाडी कर्मचा-यांच्या योजनेवरील जो खर्च २१,५०० करोड होता तो ३०० करोड रुपयांनी कमी केला आहे व तसेच मनरेगा योजनेवरील खर्चही कमी केला आहे. या बजेट मध्ये केंन्द्र सरकारने खतांवरील देण्यात येणारी सबसिडी पण कपात करुन शेतक-यां वर हल्ला केला आहे. आधीच शेतकरी हे संकटात आहेत व पुन्हा या बजेटमध्ये संकटात टाकले आहे.
अरुण लाटकरांनी या निदर्शनात हजर असलेल्या शेकडो अंगणवाडी सेविकांना येणारा १६ फेब्रुवारीचा कामगारांचा औद्योगिक बंद व संयुक्त किसान मोर्चा तर्फे पुकारण्यात आलेला ग्रामीण बंदचा प्रचार करुन मोदीच्या नेतृत्वातील भाजपाला पराभूत करण्याचा संदेश प्रस्वर प्रचार करुन राबविण्याचे आवाहन केले. या निदर्शनास सिटू चे कॉ.दिलीप देशपांडे, महासचिव, अंगणवाडीच्या नेत्या कॉ.चंदा मेंढे, कॉ.शशी काळे, अध्यक्ष, नागपूर जनरल लेबर युनियन व जेसिटीयुएचे कॉ.गुरुप्रितसंह, एमएसएमआरएचे कों चंद्रशेखर मालविय, हयांनी संबोधित केले. निदर्शनाचे नेतृत्व कॉ. रामेश्वर चरपे, चंदा मारिया, माधुरी जामगडे, मिना पाटील, मिनाक्षी फुलझेले, प्रिति पराते, लता साठवणे, चंदा काशी, कोमल, पुर्णिमा सहारे, सविता नारनवरे, नंदेश्वर आदीनी केले व शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनिस हयांनी हया आंदोलनात सहभाग नोंदवला.

Latest Posts

Don't Miss