Thursday, January 16, 2025

Latest Posts

मी मॅनेज होत नाही, ही खरी अडचण

जरांगे पाटलांचे वादळ मुंबई जवळ दाखल

Jarange Patil Near Washi : वडगाव शेरीत आंदोलकांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले, ‘मुंबईत आंदोलनावेळी जर एखाद्या आंदोलकाला कोणी त्रास दिला तर महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या गल्लीगल्लीत मराठा रस्त्यावर उतरेल.’ मी ‘मॅनेज’ होत नाही, ही खरी सरकारची अडचण आहे. (I will Never Manage Says Jarange patil) त्यामुळे आता आरक्षण घेतल्याशिवाय मी माघारी फिरणार नाही, असा निश्चय त्यांनी बोलून दाखवला.जरांगे पाटील यांची पदयात्रा उद्या दिमाखात मुंबईत दाखल होत आहे. (Jarange Patil Rally Tomorrow in Mumbai) आज पाचलांच्या भगव्या वादळाचे वाशीत मुक्काम आहे. जरांगे म्हणाले, ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू नये, यासाठी काहींनी पाचर ठोकली होती.परंतु आता ती पाचर काढून मी खुट्टा ठोकला आहे. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि यात कोणी आडवा आला तर त्याला सोडणार नाही. प्रसंगी छातीवर गोळ्या झेलेन असेही जरांगे म्हणाले.(Maratha Reservation is Our Right say jarange patil)

मराठा आंदोलनाचे लोण मुंबईच्या दिशेने सरकू लागल्याने राज्य सरकारही सावध झाले आहे. ‘मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशनामध्ये तोडगा काढू, आरक्षणातील त्रुटी दूर करण्याचे काम राज्य मागासवर्ग आयोग करेल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दुसरीकडे या प्रकरणी दाखल क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारने कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांच्या आंदोलनास कोर्टाने हिरवा कंदील दर्शविला. जरांगे यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे.

‘मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली विराट पदयात्रा मुंबई जवळ पोहचली आहे. राज्यभरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईत आले तरी कायदा व सुव्यवस्था राखली जाईल. इतकेच नव्हे तर जनजीवन विस्कळित होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेऊ,’ अशी हमी राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाला दिली.

त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘मनोज जरांगे हे २६ जानेवारी रोजी मुंबईत येणार असून यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच आंदोलनादरम्यान पंढरपूर येथे एका विकलांग तरुणाने आत्महत्या केली; मात्र तो तरुण माळी समाजाचा असल्याचे उघड झाले आहे.

त्यामुळे ही आत्महत्या नाही; तर मराठा समाजाच्या आंदोलकांनी केलेली हत्या आहे,’ असा दावा करत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच हे आंदोलन रोखण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी केली होती. या याचिकेवर आज न्या. अजय गडकरी आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

जरांगे यांना नोटीस

ॲड. सदावर्ते यांनी आंदोलनाला विरोध करत आझाद मैदानात परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी बाजू मांडताना न्यायालयाला सांगितले, की ‘जरांगे-पाटील यांच्याकडून आंदोलनाबाबत कोणताही अर्ज करण्यात आलेला आलेला नाही.’

सराफ यांनी सर्वोच्च न्यायालयातील शाहीनबाग प्रकरणाचा दाखला दिला व न्यायालयाला सांगितले की ‘या निकालात नमूद केलेल्या कायदेशीर भूमिकेचे पालन केले जाईल. इतकेच नव्हे तर आवश्यक असल्यास राज्य सरकार आंदोलनासाठी योग्य ती जागा सुचवेल. मुंबईतील जनजीवन विस्कळित होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. पोलिस बंदोबस्त तैनात केला जाईल.’ या माहितीनंतर न्यायालयाने जरांगे-पाटील यांना नोटीस बजावत या प्रकरणावरील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी निश्चित केली आहे.

Latest Posts

Don't Miss