Monday, November 18, 2024

Latest Posts

मेरी कोम म्हणाली…. मी अशी कोणतीही घोषणा केली नाही

Indian Boxer Mary Kom Retire News : सहा वेळा जग्गजेते पदावर नाव कोरणारी आणि २०१२ मध्ये भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या मेरी कोमने बॉक्सिंगला राम राम केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.. बुधवारी तिने आपण बॉक्सिंगमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र या सगळ्या चर्चांदरम्यान मेरी कोमची पोस्ट समोर आली आहे. माझ्या निवृत्तीच्या बातम्या येत आहेत मात्र मी कुठलीही घोषणा केलेली नाही असं तिने म्हटलं आहे. (I Never Said Anything About My Retirement)

काय म्हटलं आहे मेरी कोमने?

“मी बॉक्सिंगमधून निवृत्त होत असल्याची कुठलीही घोषणा केलेली नाही. माझं जे म्हणणं होतं ते चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं. जेव्हा मला निवृत्ती जाहीर करायची असेल तेव्हा मी स्वतः माध्यमांसमोर येऊन म्हणणं मांडेन. काही मीडिया रिपोर्टनुसार मी निवृत्तीची घोषणा केली आहे असं सांगितलं जातं आहे मात्र ते योग्य नाही. (Indian Boxer Mary Kom rumour for Retirement) मी २४ जानेवारी रोजी डिब्रूगढ येथील एका शाळेत गेले होते. तिथे मी हे म्हटलं होतं की मला अजूनही खेळण्याची इच्छा आहे. मात्र माझं आत्ताचं वय पाहता ऑलिम्पिकमध्ये मला सहभागी होता येणार नाही. त्यामुळे मी माझा खेळ करत राहते आहे. इतकंच नाही तर मी माझ्या फिटनेसवरही भर देते आहे. असं म्हटलं होतं त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मला जेव्हा निवृत्ती जाहीर करायची असेल तेव्हा मी निवृत्ती सगळ्यांच्या समोर येऊन जाहीर करेन.”(I will Declare My Retirement To Media)

कमबॅकनंतरही उत्तम कामगिरी

२०१२ मध्ये जेव्हा मेरीने ऑलिम्पिक पदक जिंकलं त्यानंतर तिने तिसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिने काही काळ विश्रांती घेतली. २०१८ मध्ये दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड चँपियनशिपमध्ये तिने जोरदार कमबॅक केलं आणि युक्रेनच्या हन्ना ओखोटाला ५-० ने हरवलं. तसंच यानंतर एक वर्षाने तिने तिचं आठवं वर्ल्ड मेडल जिंकलं. आत्तापर्यंत भारतीय बॉक्सिंगपटूने कधीही न केलेली कामगिरी मेरी कोमने करुन दाखवली आहे.

Latest Posts

Don't Miss