Saturday, November 16, 2024

Latest Posts

देशात भारताचा डंका : सूर्याला टी 20 प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार जाहीर

Suryakumar Yadav ICC Award : आयसीसी T20 प्लेअर ऑफ इयरच्या पुरस्कारावर सूर्यकुमार यादवने आपले नाव कोरले आहे. भारताचा मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज अशी ओळख असलेल्या सूर्यकुमार यादवने 2023 साठी टी 20 प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावला. त्याने टी 20 मध्ये जवळपास 150 च्या स्ट्राईक रेट आणि 50 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव सध्या घोट्याच्या दुखापतीतून सावरत आहे. तो आता थेट टी 20 वर्ल्डकपमध्येच भारताकडून खेळताना दिसेल. (ICC T20 Player Of The Year for Suryakumar yadav)

सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी 17 डावात 733 धावा केल्या आहेत. त्याने या धावा 48.86 च्या सरासरीने आणि 155.95 च्या स्ट्राईक रेटने केल्या. 2023 मध्ये वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांच्याविरूद्धच्या मालिकेव्यतिरिक्त सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अर्धशतकी खेळी केली.

त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 42 चेंडूत 80 तर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 36 चेंडूत 56 धावा केल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 56 चेंडूत 100 धावा देखील केल्या होत्या. हे शतक मालिकेतील फायनल सामन्यावेळी ठोकले होते.
सूर्याने जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरूद्ध 51 चेंडूत 112 धावा ठोकल्या होत्या. त्यात 9 षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता. त्याने प्रत्येक तीन चेंडूनंतर चौकार मारला होता. त्याचे हे शतक टी 20 क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान शतक होते. यापूर्वी रोहित शर्माने 2017 मध्ये 35 चेंडूत शतक ठोकले होते.

Latest Posts

Don't Miss