Monday, November 18, 2024

Latest Posts

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मोदी यांनी फंक्शन केलं

आमच्याकडे देशाला बळ देणाऱ्या पाच योजना – राहुल गांधी

Rahul Gandhi Latest Statement On Ayodhya :२२ जानेवारीच्या दिवशी राम मंदिरात राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या सोहळ्याला रामभक्तांची आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. तसंच लाखो लोकांनी हा सोहळा लाईव्हही पाहिला. या कार्यक्रमाला सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र हा भाजपाचा कार्यक्रम आहे असं म्हणत त्यांनी यावर बहिष्कार घातला. याबाबत आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.(Rahul gandhi reaction on ayodha Ram mandir)

काय म्हणाले राहुल गांधी?

देशात ‘राम लहर’ अर्थात रामभक्तीची लाट आली आहे. त्यासाठी तुम्ही कसे तयार आहात असं विचारलं असता, राहुल गांधी यांनी “रामभक्तीची लाट वगैरे काहीही नाही प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे नरेंद्र मोदींचा शो होता. (It was narendra modi show)नरेंद्र मोदी यांनी फंक्शन केलं. ते सगळं ठीक आहे. आमच्याकडे देशाला बळ देणाऱ्या पाच योजना आहेत. आम्ही त्या लोकांसमोर ठेवतो आहोत.” असं उत्तर दिलं आहे.

अयोध्येला जाणार का?

अयोध्येला जाणार का? असं विचारलं असता राहुल गांधी म्हणाले मी भारत जोडो न्याय यात्रेत आहे. तसंच पक्षाने जो मार्ग ठरवून दिला आहे त्यात अयोध्या येत नाही. भारत जोडो न्याय यात्रेच्या मागे न्यायाचा विचार आहे. युवकांना न्याय, स्त्रियांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय, कामागारांना न्याय आणि समान भागिदारी हे पाच स्तंभ देशाला शक्ती देतील. पुढचा दीड महिना आम्ही हे स्तंभच देशासमोर ठेवणार आहोत असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

Latest Posts

Don't Miss