Monday, November 18, 2024

Latest Posts

मी गावापासून लांब जात आहे…परत येणार की नाही…

छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन जरांगे पाटील मुंबईकडे रवाना

Jarange Patil Latest News Today : मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबईकडे कूच केली. यावेळी अंतरावाली सराटी येथून मराठा समाज त्यांच्यासोबत निघाला आहे. (Jarange patil Mumbai Andolan) मनोज जरांगे अंतरावाली सराटीतून निघाल्यावर पुन्हा भावूक झाले. शनिवारी सकाळापासून दुसऱ्यांदा त्यांच्या डोळ्यात आश्रू आले. यावेळी बोलताना त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. २६ जानेवारीला मुंबईतील गल्ली गल्लीत मराठा दिसणार आहे. आता मला गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही. मी मरण्यास भीत नाही. समाजासाठी मी लढत राहणार आहे. मराठ्यांनी आरक्षण घेण्यासाठी माझ्यामागे पुन्हा एकदा ताकदीने उभे राहा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील केले.

मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले. त्यापूर्वी सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांच्या डोळ्यात आश्रू आले. त्यावेळी सरकार किती निष्ठूर आहे. अनेक वर्षांपासून मराठा समाज आंदोलन करत आहे. शेकडो जण शहीद झाले आहेत. त्यानंतरही सरकारला जाग आली नाही. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण दिले नाही. आंदोलनाचे हे दिवस आठवून आपल्या डोळ्यात पाणी आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुंबईला निघताना पुन्हा मनोज जरांगे पाटील यांचे डोळे पाणावले. आपण गावापासून लांब जात आहोत. यामुळे भावूक झाल्याचे त्यांनी सांगितले.

आता माघार नाही

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मराठा समाजावर आतापर्यंत प्रचंड अन्याय झाला आहे. मराठा समाजास आरक्षण मिळत नाही, यामुळे मराठा समाजाची मुले टोकाचे पाऊल उचलत आहेत. 54 लाख लोकांच्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. त्यामुळे कोट्यवधी मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळू शकते. परंतु सरकार ऐकण्याच्या मनस्थित नाही. यामुळे आपला जीव गेला तरी आता माघार नाही. समाजासाठी मी सुद्धा शहीद होणार आहे. 26 जानेवारी रोजी मुंबईतील गल्ली गल्लीत मराठा समाज दिसणार आहे. मुंबईतील आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कवर आपण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

Latest Posts

Don't Miss