Tuesday, November 26, 2024

Latest Posts

विमाने जमीनीवर प्रवासी वाऱ्यावर

दाट धुक्यामुळे देशातील अनेक राज्यात विमान सेवा प्रभावीत

Flight Cancelled News : देशातील सतरा राज्यांची बुधवारची सकाळ दाट धुक्याने झाली. राजधानी दिल्लीत किमान तापमान ४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. परिणामी रेल्वे वाहतूक आणि विमान सेवा विस्कळीतच राहिली. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १७० उड्डाणांना फटका बसल्याने अनेक प्रवाशांचा विमान प्रवास रेंगाळला. त्यामुळे बुधवारी विमाने जमीनीवर होते तर प्रवासी वाऱ्यावर. (Flight Cancelled Due To Fog)

यात देशार्तंगत आणि परकी विमान सेवेचा समावेश आहे. दिल्लीत सुमारे २० रेल्वेगाड्या उशीराने दाखल होत असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले. (Trains Running Delay) उत्तर भारतातील अन्य शहरात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत हवामानात सुधारणा झाल्याने विमान सेवा सुरळीत राहिली. ( Many Flight Take Off Stopped Due To Fog )

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्ली, हरियाना, पंजाबमध्ये काही दिवस धुके आणि थंडीची लाट राहू शकते. त्यामुळे रेड ॲलर्ट जारी करण्यात आला. बिहारच्या पाटण्यात काश्‍मीरपेक्षा अधिक थंडी आहे. या ठिकाणी कमाल तापमान १३.२ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. तर जम्मूत कमाल तापमान १६.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

देशभरातील बहुतांश भागात धुक्याची चादर पसरल्याने विमानसेवा सलग तिसऱ्या दिवशी विस्कळित राहिली आहे. गेल्या दोन दिवसांतील हवामान पाहता इंडिगोचे २२ टक्के विमाने मेट्रो शहरात ठरल्या वेळेत उड्डाणे करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तर एअर एशियाचे ३० टक्के विमाने वेळेत जात असल्याचे सांगण्यात आले. इंडिगोकडून दररोज १७६० उड्डाणे होतात त्यापैकी केवळ २२ टक्के म्हणजेच ३८७ विमानांनी ठरल्या वेळेत उड्डाण केले.

Latest Posts

Don't Miss