Sunday, November 17, 2024

Latest Posts

काँग्रेसच्या यात्रेला परवानगी मात्र या घातल्या अटी

Bharat Jodo Nyay Yatra Manipur News : काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा प्रारंभ १४ जानेवारीला मणिपूरमधून होणार आहे. येथील हप्ता कांगजेबुंग मैदानातून या यात्रेस सुरुवात करण्यासाठी मणिपूर सरकारने बुधवारी परवानगी दिली.(Conditional Permission To Congress Nyay Yatra) मात्र या यात्रेत मणिपूर सरकारने काही निर्बंध लावले आहेत.

काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा प्रारंभ १४ जानेवारीला मणिपूरमधून होणार आहे. येथील हप्ता कांगजेबुंग मैदानातून या यात्रेस सुरुवात करण्यासाठी मणिपूर सरकारने बुधवारी परवानगी दिली. मात्र, त्यात मर्यादित संख्येने सहभागाची अट घालण्यात आली आहे. या संदर्भात परवानगीसाठी काँग्रेसने संपर्क साधल्यानंतर आठ दिवसांनी मणिपूर सरकारने ही मंजुरी दिली.

इम्फाळ पूर्व जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून १४ जानेवारी रोजी या यात्रेस हिरवा झेंडा दाखवून सहभागींच्या मर्यादित संख्येने प्रारंभ करण्याची परवानगी देण्यात येत आहे. आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून या यात्रेत सहभागी होणाऱ्यांची संख्या आणि नावे या जिल्हाधिकारी कार्यालयास आधी देण्यास सांगण्यात आले आहे.

या आदेशात नमूद केले, की इम्फाळ पूर्व जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या अहवालानुसार भारत जोडो न्याय यात्रेच्या उद्घाटन सोहळय़ात मोठी गर्दी अपेक्षित आहे. मणिपूरमधील सध्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता आणि कलम १४४ अंतर्गत इम्फाळ पूर्व जिल्ह्यात प्रतिबंधित आदेश लागू आहेत. या पार्श्वभूमीवर या संभाव्य मोठय़ा मेळाव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही पोलीस अधीक्षकांनी या अहवालाद्वारे दिला आहे.

Latest Posts

Don't Miss