अव्हाडांचे अमोल मिटकरी यांना सडेतोड उत्तर
Jitendra Awhad Latest Statement On Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं होतं. अनेक ठिकाणी जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर, ठिकठिकाणी आव्हाडांविरुद्ध आंदोलनही करण्यात आली होती. अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी प्रभू श्री राम मांसाहारी असल्याचं सिद्ध करावे, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांना दिलं होतं. आता आव्हाडांनी अमोल मिटकरींना प्रत्युत्तर देत इशारा दिला आहे. (Jitendra Awhad Reaction on Amol Mitkari)
अमोल मिटकरी काय म्हणाले होते?
“संविधानाचा डंका पिटणारे ठाण्याचे नेते कदाचित संविधानाची उद्देशिका विसरलेत. भारतीय संविधानाने प्रत्येकाला श्रद्दा व उपासनेचे अधिकार दिले आहेत. प्रभु श्री रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून आपलं शिबिर चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्याने श्रीराम मांसाहारी होते हे सिद्ध करावे,” असं आव्हान मिटकरींनी ‘एक्स’ अकाउंटवर ट्वीट करत आव्हाडांना दिलं होतं.
“व्याख्यानं देण्यासाठी मिटकरी आठ ते दहा हजार रूपये घ्यायचे”
याबद्दल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “अमोल मिटकरींनी केलेली वादग्रस्त विधाने बाहेर काढली तर, त्यांना महाराष्ट्र सोडावा लागेल. महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर व्याख्यानं देण्यासाठी मिटकरी आठ ते दहा हजार रूपये घ्यायचे. अजित पवारांनी ५० हजार रूपये पगारावर ठेवलेल्या माणसानं उंचीपेक्षा जास्त बोलू नये.” (They are Ajit Pawars Salaried people)
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?
राष्ट्रवादी काँग्रेस शिर्डीत शिबीर पार पडलं. तेव्हा बोलताना आव्हाडांनी म्हटलं, “प्रभू श्री राम बहुजनांचे आहेत. श्री राम शिकार करून मांसाहार करत असायचे. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र, आम्ही प्रभू श्री रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”