विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांची माहिती
Nagpur Petrol Pump Latest News : गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या तुडवड्याचा सामना करणाऱ्या नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे.आज संध्याकाळ पर्यंत इंधनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी आॅन लाईन रिपोर्टशी बोलताना दिली.(Till Evening petrol will be available in all petrol pump in nagpur)
केंद्र सरकारने लोकसभेमध्ये संमत केलेल्या हिट आॅड रन हा कायदा रद्द अथवा त्यात दुरुस्ती करण्याची मागणी करत ट्रक चांलकांनी देश भरात संप पुकारला होता.त्यामुळे नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संपामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला होता.संपा बाबत संभ्रमची स्थिती दिसून येत होता.अनेकांचे वाहने ड्राय झाली होती.शाळा महाविद्यालयांच्या बसेससह महामंडळाच्या बसेस आणि रुग्णवाहिकांचे चाके थांबली होती. मात्र आता संप संपुष्टात आला आहे.परंतु दोन दिवसात अनेक पेट्रोल पंप ड्राय झाले असल्याने पंपावर टँकर पोहचण्यापर्यंत नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे. विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता (VPDA Amit Gupta To Online Reporter) यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळपासून तेल डेपोतून टॅंकर निघाले आहेत. संध्याकाळ पर्यंत स्थिती नियंत्रणात येईल.नागरिकांनी पॅनिक होऊ नये. अफवांवर विश्वास ठेऊ नये. जरी शहरात 50 टक्के पेट्रोल पंप ड्राय झाले असले तरी सायंकाळ पर्यंत ते ही सुरु होतील. बोरखेडीसह इतर तेल कंपन्यांच्या डेपोतून अनेक टँकर नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत असेही गुप्ता यांनी सांगितले.