Government New Guidlines for ICU : आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. आता कोणतेही रुग्णालय कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध कोणत्याही गंभीर रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करू शकणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयसीयूमध्ये प्रवेश करण्याच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, गंभीर आजारी रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांनी नकार दिल्यास रुग्णालये त्यांना आयसीयूमध्ये दाखल करू शकत नाहीत. आरोग्य मंत्रालयाने 24 डॉक्टरांच्या टीमच्या शिफारशींच्या आधारे ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. (New Guidlines For Icu By Central Govt)
- एखाद्या गंभीर रुग्णावर आणखी काही उपचार करणे शक्य नसेल किंवा उपचार उपलब्ध नसतील आणि त्याला आयसीयूमध्ये दाखल करूनही त्याच्या जीविताविषयी काहीच खात्री देता येणार नसेल, तर त्याला आयसीयूमध्ये दाखल करणे व्यर्थ आहे.
- कुटुंबाच्या संमतीशिवाय कोणत्याही रुग्णाला आयसीयूमध्ये ठेवले जाणार नाही.
- साथीचे रोग, आपत्कालीन स्थिती आदी प्रसंगी उपचारासंबंधीचे स्रोत मर्यादित असल्यास त्या परिस्थितीचा अन्य रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करताना विचार केला जावा.
- ज्या रुग्णांना आयसीयूची विशेष गरज नाही किंवा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास विशेष वाव नाही अशा रुग्णांना या यादीतून बाहेर ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे.
- मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर एखाद्या रुग्णाला हेमोडायनामिक अस्थिरता असेल, ऑक्सिजनच्या आधाराची गरज असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, त्याला हृदयविकाराचा झटका आला असेल, रक्ताच्या उलट्या होत असतील, अवयवांच्या आधाराची गरज असेल, वैद्यकीय स्थिती किंवा आजार गंभीर असण्याची शक्यता असल्यास, त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले जाऊ शकते.
- आयसीयू मध्ये दाखल करणं आणि डिस्चार्ज करण्याचं निकष विस्तृत स्वरूपाचे आहेत. आयसीयूमध्ये कुणाला कधी, कितीवेळ ठेवायचं, हे बरेच काही उपचार करणार्या डॉक्टरांवर सोडण्यात आलंय.
7. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आयसीयू बेडच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णामध्ये रक्तदाब, पल्स रेट, ब्रेथ रेट, ब्रीदिंग पॅटर्न, हार्टरेट, ऑक्सीजन कंसेंट्रेशन, यूरिन प्रोडक्शन आणि न्यूरोलॉजिकल