Monday, November 18, 2024

Latest Posts

त्यांची आमच्यासोबत बसण्याची औकात नाही

वाद वाढले : इंडिया आघाडी तुटण्याच्या मार्गावर ?

India Alliance Kunal Ghosh Latest News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात सर्वच राजकीय पक्ष आपपाली मोर्चेबांधणी करत आहेत. भाजपला तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यापासून रोखणं हेच विरोधी पक्षांच प्रमुख लक्ष्य आहे. विरोधी इंडिया आघाडीच्या नावाखाली एकत्र आलेत. (Loksabha Election 2024) यात काँग्रेस मुख्य पक्ष आहे. पण आता इंडिया आघाडीतच एक वाक्यता नसल्याच दिसून येतय. (Tmc Leader Kunal Ghosh Left Party)

पुढच्यावर्षी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयाची हॅट्रीक करण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आला आहे. काँग्रेस मोठा पक्ष आहे. विरोधकांनी आपल्या आघाडीला इंडिया नाव दिलय. सर्व विरोधक भाजपाला हरवण्याची प्लानिंग करत आहेत. पण त्याचवेळी विरोधी पक्षांमध्ये आपसातही जमत नाहीय. पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस आणि डाव्या पक्षामध्ये परस्पर विरोधाचे सूर तीव्र होऊ लागले आहेत. सीपीआय (एम) वर टीएमसी नेते कुणाल घोष (Kunal Ghosh) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. बंगालमध्ये ‘लेफ्ट’ नाहीय. लेफ्ट पार्टीच्या लोकांची टीएमसी सोबत बसण्याची औकात नाहीय, असं ते म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वयासंबंधी कृणाल घोष म्हणाले की, “मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्टपणे सांगितलय की, इंडिया आघाडी देशामध्ये लढेल आणि टीएमसी बंगालमध्ये भाजपाविरोधी अभियानाच नेतृत्व करेल. आम्ही 2021 मध्ये भाजपाला हरवलं. सीपीआय (एम) आणि काँग्रेसला शुन्य जागा मिळाल्या. त्यांनी भाजपाच्या फायद्यासाठी मतविभाजन केलं. जागा वाटपासंबंधी ममता बॅनर्जी अंतिम निर्णय घेतील. इथे कुठला लेफ्ट पक्ष नाहीय” “लेफ्टच्या लोकांची टीएमसीसोबत बसण्याची औकात नाहीय” असं कृणाल घोष एएनआयशी बोलताना म्हणाले.

Latest Posts

Don't Miss