Saturday, November 16, 2024

Latest Posts

काश्मीरात थंडीने मोडले सर्व विक्रम

पिण्याच्या पाण्याचे पाइप देखील गोठले

Kashmir Lowest Temperature 2023: श्रीनगर शहरातील दल सरोवर गोठले आहे. पिण्याच्या पाण्याच्या पाईप्स देखील गोठले आहे. लोकं शेकोटी लावून बसत आहेत. दरम्यान काश्मीर खोऱ्यात थंडीची लाट सुरु झाली आहे. (Kashmir cold breaks all record) पुढील ४० दिवस ही लाट कायम राहणार आहे.दरम्यान कश्मीरच्या थंडीने आता पर्यंतच्या सर्व विक्रम मोडला आहे.

शुक्रवारी काश्मीरमध्ये थंडीच्या लाटेने लोकांनी घराबाहेर येणे टाळले आहे. थंडीमुळे काश्मीर खोऱ्यातील तलाव आणि पिण्याच्या पाण्याचे पाइप गोठले आहेत. ‘चिल्लई कलान’ नावाच्या 40 दिवसांच्या प्रदीर्घ थंडीचा शुक्रवारी दुसरा दिवस होता. हा कालावधी ३० जानेवारीला संपणार आहे. खोऱ्यातील तलाव गोठले आहेत. श्रीनगर शहरातील दल तलावातील अर्धवट गोठलेल्या पाण्यातून खलाशांनी मार्ग काढला. लोक संपूर्ण परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईप्सच्या आजुबाजुला लहान शेकोटी पेटवताना दिसत होते.

तापमान शून्य ते 3.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले

“श्रीनगरमध्ये आज किमान तापमान उणे 3.3 अंश सेल्सिअस होते, तर गुलमर्ग आणि पहलगाममध्ये ते अनुक्रमे उणे 1 अंश आणि उणे 4.8 अंश सेल्सिअस होते,” असे हवामान विभागाच्या निवेदनात म्हटले आहे. लडाख विभागातील लेह शहरात किमान तापमान उणे 14.4 अंश होते. कारगिलमध्ये उणे 9.9 आणि द्रासमध्ये उणे 12.3 अंश सेल्सिअस तापमान होते. जम्मू शहरात रात्रीचे किमान तापमान 8.5 अंश सेल्सिअस, कटरा येथे 7.9, बटोटे येथे 6.3, भदेरवाहमध्ये 3.5 आणि बनिहालमध्ये 3.8 अंश सेल्सिअस होते.

Latest Posts

Don't Miss