Saturday, November 16, 2024

Latest Posts

आमचा प्रश्न अदानीला तर उत्तर देताहेत चमचे : Uddhav Thackeray Statement In Winter Assembly

उद्धव ठाकरेंचा विधान भवन परिसरात टोला

Uddhav Thackeray Statement In Nagpur Winter Assembly : शिवसेनेसह (उद्धव बाळासाहेब ठाकरे) इतर विरोधी पक्षांनी मिळून धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाविरुद्ध मोर्चा काढला होता. त्या मोर्चावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेणारी ही मंडळी अदानींचे चमचे आहेत, असा टोला सोमवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना लगावला. (Uddhav Thackeray says We Questioned Adani Answer From His Spoon )

धारावी प्रकल्पाविरुद्ध काढलेल्या मोर्चामधील माणसे केवळ धारावीतील नव्हती, हा मोर्चा सेटलमेंट मोर्चा होता, अशी टीका होत आहे. या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले,‘आम्ही मुंबईतून नाही तर चंद्राहून माणसे आणली. या मोर्चात फक्त भाजप नव्हती. ते असते तर सेटलमेंट झाली असती.’ मुंबई विकण्यासाठी काही लोक अदानींची चमचेगिरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्या दिल्ली येथे जाणार आहे. बैठकीचा अजेंड उद्या कळेल, असेही त्यांनी सांगितले.

आमच्याकडे पुरावे मग एसआयटी का नाही?

सलीम कुत्ता संदर्भात आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत विषय मांडताच एसआयटी लावली. पण, आमच्याकडे याच कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन नाचतानाचा पुरावा आहे. हे पुरावे सभागृहात दाखविल्यानंतरही सरकार आम्हाला बोलू देत नाही. आमच्याकडे असलेल्या पुराव्याच्या आधारे एसआयटी लावण्यात यावी, असे ठाकरे म्हणाले.

छत्रपतींची शपथ घेणाऱ्यांनी चर्चा करू नये

छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेणाऱ्यांनी आता मराठा आरक्षणावर चर्चा करू नये. तर मराठा आरक्षण कसे देता येईल, हे सांगावे. तसेच कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर सरकारच्या भूमिकेला आमचा पाठींबा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान गुजरातचेच आहेत का?

गुजरातध्ये सूरत डायमंड बोर्स सुरू झाला आहे. त्याचा फटका मुंबईतील हिरे व्यवसायाला बसला आहे. पंतप्रधान महाराष्ट्राची आर्थिक राजधानी गुजरातला हलविण्याच्या मार्गावर आहेत. ते त्यांच्या भाषणातसुद्ध गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होईल, असे म्हणतात. ते केवळ गुजरातचेच आहेत का, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केल.

Latest Posts

Don't Miss