नागपूर: नागपुरात सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानात ट्रान्सजेंडर राईट्स कमिटीने (टीआरसी) मंगळवारी विधान भवनासमोर आंदोलन केले. NALSA अहवाल 2014 आणि ट्रान्सजेंडर अधिकार संरक्षण विधेयक 2019 चे निष्कर्ष तात्काळ लागू केले जावे आणि सर्व सरकारी नोकऱ्या आणि इतर संस्थांमध्ये ट्रान्सजेंडरचा कोटा तयार करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. याशिवाय आंदोलन करत्यांनी छत्तीसगड मॉडेलच्या अंमलबजावणीची मागणी केली. ज्यामध्ये प्रशासनाने सार्वजनिक क्षेत्रातील पदांवर 1 टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. टीआरसीच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले होते. विधानसभा अध्यक्षांना निवेदनही देण्यात आले होते