Sunday, November 17, 2024

Latest Posts

Infosys लवकरच आठवड्याला 3 दिवस कार्यालयातून काम करणे अनिवार्य करणार

Infosys Latest News : भारतातील दुसरी सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान (IT) सेवा प्रदान करणारी Infosys कंपनी लवकरच आपल्या कर्मचार्‍यांसाठी आठवड्यातून तीन दिवस कार्यालयातून काम करणे अनिवार्य करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

“द इकॉनॉमिक टाईम्सने संदर्भात एक वृत्तप्रकाशित केले आहे. त्यांनी सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, सामान्य कार्यालयीन कामगाजाकडे परत येण्यासाठी व्यवस्थापनाच्या अयशस्वी प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितल्या जात आहे. इन्फोसिसच्या विविध प्रमुखांनी कर्मचाऱ्यांना ई-मेल करून आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात येण्यास सांगितले आहे.

ई-मेलनुसार, लवकरच कर्मचारयांना आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयातून काम करणे अनिवार्य करण्यात येणार आहे. वैद्यकीय कारणाशिवाय कर्मचाऱ्यांनी घरून काम करू नये व कार्यलयात उपस्थिती नोंदवावी असे ई मेल मध्ये म्हटले आहे. पण अद्याप कंपनी कडून यासंदर्भात अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही.

Latest Posts

Don't Miss