महाविकास आघाडीद्वारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधानभवन परिसरात आंदोलन
Winter Assembley 2023 Latest News : राज्यातील शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अजूनही शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची मदत मिळालेली नाही.अशात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीने विधान भवन परिसरात सकाळी आंदोलन करत सरकारचा निषेध केला आहे.(On First Day Of Nagpur Wiinter Assembly Mahavikas Aaghdi Protest For Farmer) शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार चारसो बीस अशी नारेबाजी करत परिसर दणाणून सोडला.
हिवाळी अधिवेशाना निमित्त अवघे मंत्रालत नागपूरात आले आहे.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले.यात नेत्यांनी गळ्यात संत्री, वांगी यांची माळ घातल्या होत्या, शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाझर, सरकार दाखवतंय गाजर, शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार चारसो बीस,विमा कंपन्या झाल्या मालामाल, शेतकरी झाला कंगाल अशा घोषणा केल्या.महाविकास आघाडीतर्फे पहिलेच आंदोलन असल्याने यात विरोधि पक्ष नेले विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, सुनील प्रभू , नाना पटोले, अनिल देशमुख, अभिजित वंजारी, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात, रवींद्र धंगेकर, अशोक चव्हाण यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केला.