Monday, November 18, 2024

Latest Posts

युवा संघर्ष यात्रेचा समारोप १२ डिसेंबरला – Anil Deshmukh

उद्धव ठाकरे, दिग्विजय सिंग उपस्थीत राहणार

Anil Deshmukh on Yuva Sangharsh Yatra : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेब हे १२ डिसेंबरला नागपूर येथे येत आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थीतीत दुपारी २.०० वाजता झिरोमाईल येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये आ. रोहीत पवार यांच्या ८०० किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप होणार आहे. या सभेला पाहुणे म्हणुन आमच्या मित्र पक्षाचे सर्व नेते उपस्थीत राहणार आहे.(NCP Chief Sharad Pawar will Present On Closing Of Yuva Sangharsh Yatra on 12 December at Nagpur) त्यामध्ये उध्दवजी ठाकरे, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग उपस्थीत राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांनी बुधवारी (6 डिसेंबर) पत्रकार परिषदेत दिली.

शेतकऱ्यांच्या कापुस, सोयाबीन, धान, संत्रा, तुर व ईतर शेतमालास  योग्य भाव द्या, पिक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना देण्यात यावा, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या, राज्यातील विविध खात्यातील रिक्त पदे त्वरीत भरा, महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा लागु करा, कंत्राटी नोकरभरती रद्द करा, ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला वाचवा, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, शाळा दत्तक योजना रद्द करा, समुह शाळा योजना रद्द करा, या व इतर मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. रोहीत पवार यांनी ही युवा संघर्ष यात्रा काढली आहे. १२ डीसेंबर ला दुपारी दोन वाजता झिरोमाईल येथे होणाऱ्या या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन  शिवसेनचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, खा. संजय राउत, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, पुथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शेकापाचे जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील महाराष्ट्रातील सर्व मित्र पक्षाचे खासदार, आमदार व वरीष्ठ नेत्यांना या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थीत राहण्याचे निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

Latest Posts

Don't Miss