म्हणाले आता पुढील महापरिनिर्वाण दिनाला स्मारकालाही अभिवादन करु
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज (६ डिसेंबर) चैत्यभूमीवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी आणि अजित पवार, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह अनेक अधिकारी आणि नेतेमंडळी उपस्थित होते.(Important Hints Given By Fadnavis on Dr Babasaheb Ambedkar Memorial In Indu Mill) यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदू मिल येथे होत असलेल्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका बद्दल माहिती दिला.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, मला या गोष्टीचं समाधान आहे की अनेक वर्ष इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावं अशी मागणी चालली होती. यासाठी अनेक आंदोलने झाली. मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी, पंतप्रधान मोदींना विनंती केली की इंदू मिलची जागा आपल्याला मिळाली आहे. आता भव्य स्मारकाचं निर्माण तिथं होत आहे. आमचा प्रयत्न तरी असा आहे की पुढच्या महापरिनिर्वाण दिनाला आपण इथे येऊ तेव्हा त्या स्मारकालाही आपल्याला अभिवादन करता आलं पाहिजे या दृष्टीने पंतप्रधानांच्या नेतृत्त्वात वेगाने काम सुरू आहे”, असं म्हणत फडणवीसांनी स्मारकाबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हे काम वेगाने होत असल्याचं सांगितलं.
राज्य सरकारने दादरमधील इंदू मिलमधील ४.८४ हेक्टर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१५ मध्ये या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र या भूमिपूजनानंतर स्मारकाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्यास २०१८ पर्यंत वाट पाहावी लागली. काही कारणांमुळे कंत्राटदारास कार्यादेश देण्यास विलंब झाला. परिणामी, स्मारकाचे काम सुरू होण्यासही विलंब झाला. या स्मारकाचे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. एमएमआरडीएने आता स्मारकाच्या कामाला वेग दिला. स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे.