Saturday, November 16, 2024

Latest Posts

2024 मध्ये फडणवीस वानखेडेवर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा

Chandrashekhar Bawankule On Devendra Fadnavis : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. 2024 ला विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर  मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे विधान बावनकुळे यांनी केले आहे. (Devendra Fadnavis Will Take Oath As CM Of Maharashtra in 2024 on wankhade stadium) त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरात चर्चा होत आहे. Chandrashekhar Bawankule On BJP Latest

महाराष्ट्रात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत.अशात  चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे. भंडाऱ्यातील लाखनी इथं भाजपकडून दिवाळी मिलन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबोधित केलं. यावेळी 2024 च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोण शपथ घेणार? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना विचारला. तेव्हा कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच नावं घेतलं. यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असा संकल्प यावेळी करण्यात आला. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत थेट देवेंद्र फडणवीस यांनाचं उतरवण्याचा संकल्प बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांकडून वदवून घेतला. या मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही संकल्प दिले. त्यात मे महिन्यात देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील. त्यासाठी महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून पाठवायचे.दुसरा संकल्प वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यासाठी आपण सर्वांनी ताकद लावायची. आपले उमेदवार चांगल्या मतांनी निवडून आणायचे, असं बावनकुळे म्हणाले. जेव्हा-जेव्हा 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा मुद्दा येतो. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती निवडणूक लढणार आहे, असं भाजपकडून सांगण्यात येतं. 2024 ला कोण मुख्यमंत्री होणार, असा सवाल केल्यास आता इतकंच सांगतो की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुकांना सामोरं जाणार आहोत, असं बावनकुळे यांनीही याआधी म्हटलं आहे. पण काल त्यांनी भंडाऱ्या केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Latest Posts

Don't Miss