Saturday, November 16, 2024

Latest Posts

कोणत्या राज्यात उघडणार मोहब्बत की दुकान : Exit Poll Result 2023

एक्झिट पोलच्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे संभ्रम

Exit Poll Result 2023 : देशभरात सध्या चर्चा आहे ती पाच राज्यांमधल्या एग्झिट पोल्सची आणि त्यातून समोर आलेल्या आकड्यांची. एक्झिट पोल हा ढोबळ अंदाज असला तरी वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळे अंदाज काढल्यामुळे सर्वच संभ्रमात आले आहे.(Five States Exit Polls 2023 Election Results) या पोलनुसार राजस्थानमध्ये भाजपा पुन्हा सत्ता स्थापन करेल, तर मध्य प्रदेशात भाजपा व काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. छत्तीसगडमध्ये बघेल सरकार सत्ता कायम राखू शकते, तर तेलंगणामध्ये बीआरएसला मोठा धक्का देत काँग्रेस मुसंडी मारू शकते. मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंटला झोरम पीपल्स मूव्हमेंटकडून कडवी टक्कर अपेक्षित आहे.

पाचही राज्यातील विविध पोलचा अंदाज पाहिला तर काँग्रेसच्या मोहब्बत की दुकानाला जनतेने कौल दिल्याचे दिसून येत आहे. यंदाचा एक्झिट पोल मिझोरम आणि तेलंगणासंदर्भात बऱ्यापैकी सारखा आहे. परंतु मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसंदर्भात कन्फ्यूजन वाढवणारे अंदाज आले आहे. एक्झिट पोलनुसार तेलंगणात मोठा बदल दिसत आहे. या ठिकाणी बीआरएसची असलेली दहा वर्षांची सत्ता जाण्याची चिन्ह आहेत. काँग्रेस सत्तेवर येणार असल्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलने व्यक्त केला आहे. तेलंगणा व छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेत येणार असल्याचे विविध पोलच्या अंदाजावरुन दिसून येत आहे. तर मध्य प्रदेशात भाजपा व काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर दिसत आहे. राजस्थानमध्ये भाजपा पुन्हा सत्ता स्थापन करेल असा अंदाज आहे.मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंटला झोरम पीपल्स मूव्हमेंटकडून कडवी टक्कर अपेक्षित आहे. निकालाच्या दोन दिवस आधी या सगळ्या एग्झिट पोल्समुळे सर्वच राजकीय पक्ष खुर्चीच्या अगदी काठावर येऊन उत्सुकतेने व अधीरतेनं निकालांकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे ३ डिसेंबर रोजी मतपेट्या उघडल्यावर त्यातून नेमकं काय बाहेर पडणार? याची उत्सुकता ताणली गेली आहे.

चार राज्यात काँग्रेस येईल – वडेट्टीवार

राज्याचे विरोधीपक्ष नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चार राज्यात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे. (congress will win in four state says vijay Wadettiwar ) शुक्रवारी सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले चारही राज्यात काँग्रेस जिंकेल. राजस्थान मध्ये स्पष्ट बहुमत आहे तर तेलंगना हे सुद्धा काँग्रेसच्या वाट्याला येईल असे ते म्हणाले.

Latest Posts

Don't Miss