बॅरिस्टर गौहर खान यांना दिली उमेदवारी
Pakistan Politics : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. इमरान खान यांनी त्यांच्या जागी बॅरिस्टर गौहर खान यांना उमेदवारी दिली आहे. (Former PM of Pakistan Imran Khan took dicussion not To Fight Party Election for President Post)
डॉन वृत्तपत्रातील बातमीनुसार, 2 डिसेंबर रोजी तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक न लढण्याचा निर्णय इमरान खानने घेतला आहे. त्यांच्या जागी बॅरिस्टर गौहर खान (Barrister Gauhar Khan) यांना पक्षाध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी इम्रान खान पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आपल्याच एका ज्येष्ठ नेत्याचे विधान फेटाळून लावल्याने पक्षात संभ्रम निर्माण झाला.सध्या तुरुंगात असलेले इम्रान पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीत अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेते शेर अफजल मारवत यांनी केला होता. इमरान खान पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील…ते परत येईपर्यंत मी माझी जबाबदारी पार पाडणार आहे. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, जर पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ला आपले निवडणूक चिन्ह बॅट कायम ठेवायचे असेल तर त्याला 20 दिवसांच्या मुदतीत पक्षाच्या अंतर्गत निवडणुका घ्याव्या लागतील. अशी माहिती बॅरिस्टर गौहर खान यांनी दिली.