केंद्र सरकारकडून ताबडतोब आढावा घेण्याचे निर्देश
China Virus Latest News 2023: करोनाचा संकट उतरताच आता परत चायनामध्ये नव्या आलेल्या साथेने लहान मुलांना घेरले आहे. यात चीनमध्ये लहान मुलांमध्ये श्वसनविकारांची साथ आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांच्या सज्जतेचा ताबडतोब आढावा घेण्याचे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना रविवारी दिले. चीनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष असून, कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
करोना संकटानंतर चीनमध्ये आता लहान मुलांमध्ये श्वसनविकाराची साथ आली आहे. यामुळे अनेक देशांनी सावधगिरीची उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सावधगिरीचा उपाय म्हणून श्वसनविकारांविरुद्धच्या सज्जतेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.(In India Central Governments Precautionary Step In The Wake Of The New Epidemic In China) सध्या सुरू असलेली इन्फ्लूएन्झाची साथ आणि हिवाळ्याच्या ऋतूमुळे श्वसनविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.श्वसनविकाराच्या संसर्गांच्या वाढीवर एकात्मिक रोग देखरेख प्रकल्पांचे जिल्हा आणि राज्य विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहेत की नाही याची खातरजमा करण्याची सूचनाही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली आहे. यात लहान मुले आणि नवजात अर्भके यांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, श्वसनविकारग्रस्त रुग्णांच्या नाक आणि घशातील स्रावांचे नमुने श्वसन विकार जनकांच्या चाचणीसाठी राज्यांमध्ये असलेल्या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
डब्ल्यूएचओ काय म्हणाली
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की चीनच्या उत्तरेकडील भागात लहान मुलांमध्ये श्वसनविकारात वाढ झाली आहे. या आजाराबाबत चीनकडून अतिरिक्त माहिती मागविण्यात आली आहे. सध्या चीनमधील नागरिकांनी श्वसनविकार टाळण्यासाठी मास्कचा वापर करावा. (WHO Suggest to wear mask to china people) याचबरोबर लसीकरणावर तेथील सरकारने भर द्यावा.