Monday, November 18, 2024

Latest Posts

राज्यात किती दिवस असणार आहे पावसाचा मुक्काम

विर्दभसह उत्तर कोकण, मराठवाडाला कोणता इशारा

Maharashtra Rain News: ऐन थंडीच्या दिवसात राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी अधिक चिंतातुर झाला आहेत. नागपूरातही सोमवारी सकाळी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने राज्यात पुढील किती दिवस पाऊस असणार आहे आणि कोणत्या ठिकाणी अवकाळीचा दिला इशारा हे जाणून घेऊया. (Unseasonal Rain in November 2023 at Maharashtra )

राज्यात शनिवारपासूनच बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होता.या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला. आता हा पाऊस पुढील दोन दिवस तरी पाठलाग सोडणार नसल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रविवारी नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पालघर भागामध्ये संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपातील पाऊस बरसला. तर, काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट अनुभवायला मिळणार आहे. राज्याच्या किनारपट्टी भागातून हा पाऊस पुढे सरकणार असून, आता हिवाळ्यातही पावसाळाच अनुभवावा लागणार आहे. दरम्यान, राज्यातील तापमानात काही अंशांची घट नोंदवण्यात येणार आहे.हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे रौद्र रुप पाहायला मिळणार होते.त्या प्रमाणे  धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरा लावली. अनेक भागात गारा देखील पडल्या. तर उत्तर कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाचाने सोमवारी हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे भात पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशीम जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण असून रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरासह वाशिम तालुक्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने मध्यरात्रीपासून काही ठिकाणी जोरदार तर काही भागात अद्यापही रिमझिम पाऊस सुरुच आहे.अशात आता शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे.राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा मुक्काम असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

Latest Posts

Don't Miss