आजारातून बाहेर येताच अजितदादा अॅक्शन मोडवर
DCM Ajit Pawar on Amit Shah in Pune : डेंग्यूच्या आजारातून बरे होताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अॅक्शन मोड वर आले आहेत. पुण्यात शनिवारी सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना दादा म्हणाले मध्यंतरी मी दिल्लीला गेलो होतो. तेथे देशाचे गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. त्यावर विविध चर्चां रंगल्या. मात्र एक गोष्ट सांगतो मी तेथे कोणाचीही तक्रार केलेली नाही. तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. (I didn’t complaint about any one to Hm. Amit shah) तसेच दादांनी अधिकाऱ्यांना निवडणुकींपूर्वी विकास कामे पूर्ण करण्याचे आदेशही दिलेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना डेंग्यू झाला होता. त्यामुळे ते सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नव्हते. मात्र आजारपणातून बरं होताच अजित पवार हे अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत.(Ajit Pawar in Action Mode) अजित पवार हे सध्या पुण्यात आहेत. त्यांनी पुण्यातील शिक्षक भवनमध्ये सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी केली. बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी अमित शाहा सोबत झालेल्या बैठकीबाबात बोलत आपली भूमिका स्पष्ट केली.ते म्हणाले मी शाहा यांच्याकडे कोणाचीही तक्रार केलेली नाही. तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही असे अजितदादा म्हणाले. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर अशात मी काही प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. सगळी कामं लवकरात लवकर पूर्ण करा. पुढे आता लोकसभा निवडणूका लागतील. आचारसंहिता लागेल तेव्हा कामं मंदावतील. त्या तडाख्यात निधी देता येणार नाही. त्यामुळे आज मी वेळ काढून काम पाहायला आलो आहे. लवकरात लवकर ही कामं पूर्ण करा, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या.ही सूचना केल्या आहेत.
मनोज जरांगेवर बोलताना दादा म्हणाले..
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सध्या शाब्दिक चकमक पाहायला मिळतेय. यात अजित पवारांनी लक्ष घालावं आणि छगन भुजबळ यांना समज द्यावी, असं मनोज जरांगे पाटील वारंवार म्हणतात. त्यावर अजित पवार यांनी भाष्य केलं. प्रत्येकाची नाव घेऊन कोट करून मी बोलत नाही. पण सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या सर्वांनीच भूमिका नीटपणे समजून घेऊन कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, असं अजित पवार म्हणाले.