Monday, November 18, 2024

Latest Posts

जाणून घ्या तुळशी विवाहचा शुभ मुहूर्त : Tulsi Vivah Muhurt 2023

Tulsi Vivah Muhurt 2023 : हिंदू धर्मात तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. देशभरात तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भाऊबीज, पाडवा झाला की दिवाळी संपली असे अनेकांना वाटते पण असे असले तरी तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते..यंदा तुळशीचे लग्न कधी असणार आहे तसेच त्याचे शुभ मुहूर्त आपण जाणून घेणार आहोत.

भगवान विष्णू आषाढी एकादशीनंतर चार महिने निद्रा अवस्थेत असतात. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. या काळात कोणतीही शुभ कार्य, लग्न समारंभ सहजा करू नये अशी मान्यता आहे. कार्तिकी एकादशीला म्हणजेच देवउठनी एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेमधून पुन्हा जागे होतात आणि शुभ कार्यांना, लग्न समारंभांना सुरूवात केली जाते. कार्तिकी एकादशीच्या दिवसापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुळशी विवाह पार पडतात.(Tulsi Marriage Auspicious Date And Time) यंदा कार्तिक एकादशी २३ नोव्हेंबरला साजरी होत आहे. कार्तिक शुक्ल द्वादशीपासून तुळशीचे लग्न लावतात. तुळशीचे लग्न २३ नोव्हेंबरपासून सकाळी ६:५१ वाजेपासून सुरु होतील. २७ नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे दुपारी २:४६ वाजेपर्यंत तुळशीचे लग्न लावले जातील असे पंडित सांगतात. पौराणिक मान्यतेनुसार तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे रोप आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह करण्याची परंपरा आहे. या दिवशी तुळशी विवाह विधी केल्यास वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते.

Latest Posts

Don't Miss