Sambhaji Raje on Minister Chhagan Bhujbal: ओबीसी समाजाची एल्गार सभा जालन्यात पार पडली. या सभेत राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांचे तूफान भाषण झाले.या सभेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या सभेतून भाषण करताना छगन भुजबळ यांनी आपला मराठा आरक्षणाला विरोध नाहीये असं म्हणत तुम्हाला वेगळं आरक्षण घ्या असं म्हटलं.त्यावरुन आता छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांना धारेवर धरले आहे. त्यांनी भुजबळांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्याचे एक्सवर म्हणटंले आहे. (SambhajiRaje says Take Down Bhujbal From his Minister’s Post)
राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना ओबीसी समाजाने एल्गार सभा घेतली. इतकेच नाही तर या सभेत राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ सहभागी झाले. यावरुन छत्रपती संभाजीराजे यांनी ट्वीट करत भुजबळांवर निशाणा साधला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करत म्हटलं, “छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.”आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये संभाजीराजे छत्रपती म्हणतात, “सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ?हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी असे त्यांनी एक्सवर म्हणटंले आहे. त्यावर बोलताना “राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्व समाजाला विनंती करु इच्छितो की, महाराष्ट्रात कुठलाही समाज एकमेखांसमोर उभे आहेत अशा प्रकारची स्थिती निर्माण होणे योग्य नाही. मी ओबीसी समाजाला आश्वस्त करु इच्छितो की, कुठल्याही परिस्थितीत राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही.