Aaditya Thackeray Latest News: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर शुक्रवारी चक्क मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून पुलाचे उद्घघाटन केल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आदित्य ठाकरे अडचणीत आले आहे. (BMC Filed Fir Against Shiv Sena Leader Aaditya Thackeray)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरच राडा झाला.दोन्ही गट समोरासमोर येताच घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यावर आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त करत त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत असे वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केला.त्यानंतर शुक्रवारी रात्री बेकायदेशीर जमाव जमवून पुलाचे उद्घाटन केल्या प्रकरणात आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुलाची चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांनी पुलाचे उद्धघाटन केले आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी सुनिल शिंदे, सचिन अहिर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबईतील एन एम जोशी पोलीस स्थानकात मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला.मुंबईतील लोअर परळ उड्डाणपुलाची एक मार्गिका सुरु करण्यात आली होती. परंतु दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरु होते. हा पूल सुरु करण्यासंदर्भातील यापूर्वी अनेकवेळा डेडलाइन दिल्या होत्या. परंतु पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम अजूनही पूर्ण झाले नव्हते. हे काम रखडल्यामुळे गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्घाटन करण्यात आले.त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे अडचणीत येणार आहे.