Monday, November 18, 2024

Latest Posts

Whatsapp ने केलं हे नवं फिचर लाँच

Whatsapp New Feature: तंत्रज्ञानाच्या दुनियेत सर्वांना भुरळ घातली आहे ती व्हॉट्सॲपने. व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवे फिचर आणत असतो.गेल्या वेळी व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटाने सर्च बाय डेट हे फिचर लाँच केले होते. मात्र यंदा मोठ्या समूहासोबत संवाद साधण्यासाठी व्हॉट्सॲपने नवं फिचर लाँच केले आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे या नवं फिचर मध्ये.

व्हॉट्सॲप एक सोशल मीडिआ प्लॅटफॉर्म आहे ज्यामुळे घरबसल्या एकमेकांना संदेश पाठवणं, लांबच्या व्यक्तीशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधणं, घरबसल्या स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ आवडत्या व्यक्तीला पाठवणं, तसेच कामासंबंधित अनेक गोष्टी करणे शक्य होते. मेटा आपल्या युजर्सना नवनवीन फिचर्स, इंटरेस्टिंग अपडेट लाँच करून देत असतो. आतापर्यंत आपण सगळ्यांनी ग्रुप चॅट, ग्रुप व्हिडीओ कॉल, ग्रुप कॉलिंग अशा वेगवेगळ्या फिचर्सचा अनुभव घेतला. पण, आता सगळ्यांना “ग्रुप व्हॉईस चॅट या नव्या फिचरचासुद्धा अनुभव घेता येणार आहे. मेटाने (Meta) ग्रुप व्हॉईस चॅट (Voice Chat With Large Group) लाँच केला आहे. या फिचरमध्ये तुम्ही ग्रुपमधल्या सदस्यांशी लाईव्ह संवाद साधू शकता. तसेच या ग्रुप व्हॉईस चॅटमध्ये ३३ ते १२८ जण एकत्र संवाद साधू शकतात. ‘व्हॉईस मेसेज’ हा फिचर आधीपासून होताच, पण ग्रुप व्हॉईस चॅट फिचरचा अनुभव यापेक्षा थोडा वेगळा असणार आहे. यामध्ये तुम्ही एकापेक्षा अनेक लोकांशी आवाजाच्या मदतीने लाईव्ह संवाद साधू शकणार आहात.

Latest Posts

Don't Miss