12 नोव्हेंबरला रविवारी आनंद व उत्साहाचा सण दिवाळी देशभरात साजरी होणार आहे. मात्र यंदाची दिवाळी काही खास आहे. यावर्षी दिवाळीत तीन शुभ मुहूर्त जुळून आले आहेत. या तिन्हीपैकी कोणत्याही एका मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ फळ प्राप्त होते. (2023 This Diwali 3 Muhurt For Laxmi Pujan)
दिवाळीला प्रत्येक घरात लक्ष्मी पूजन केल्या जाते. या दिवाळीच्या दिवसात घरात प्रसन्न वातावरण असते. रांगोळ्या,झेंडूच्या फुलांच्या माळा,दिवे, आकाशकंदिल, इलेक्ट्रीक दिव्यांच्या माळा, फराळ,मिठाई घराघरात पहायला मिळते.सायंकाळी लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात केल्या जाते. या दिवशी प्रदोष काळ सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटे ते 7 वाजून 10 मिनिटांपर्यंत आहे. लक्ष्मी आणि गणेश पूजनासाठी हा काळ अतिशय शुभ राहील. यंदाच्या दिवाळीत एक दोन नव्हे तर तिन मुहूर्त आले आहेत. यावर्षी दिवाळीत एक-दोन नव्हे, तर तीन शुभ मुहूर्त जुळून आले आहे. या तीनपैकी कोणत्याही एका शुभ मुहूर्तावर पूजा करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मी आणि गणेशजी विधीनुसार पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात. त्यानुसार, पहिला शुभ मुहूर्त दिवाळीच्या सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटे ते 7 वाजून 10 मिनिटांपर्यंत असेल. हा काळ अमृताने भरलेला असेल. दुसरा शुभ मुहूर्त निशिथ काळात म्हणजे रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत असेल. यावेळी कनक धारा मंत्राचा जप केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होते. तर तिसरा आणि शेवटचा मुहूर्त हा महानिशीथ काळातील आहे, जो रात्री 11 ते पहाटे 2 वाजेपर्यंत असेल. या तिनही शुभ मुहूर्तावर केलेली पूजा खूप शुभ फळ देणारी ठरेल.
अशी करा लक्ष्मीची पूजा
Lakshmi Pujan Ase Karave : पूजेच्या ठिकाणी लाल सुती कापडावर तांदळाचे थोडे दाणे मध्यभागी ठेवा. यावर चांदीचा किंवा पितळेचा पाण्याने भरलेला कलश ठेवा. कलशात सुपारी, फुले, एक रुपयाचे नाणे आणि थोडे तांदूळ टाका. आंब्याची पाच पाने कलशावर ठेवा. हा कलश देवीच्या उजव्या बाजूला दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावा.पूजा सुरू करण्यापूर्वी खाते पुस्त, पैसे, दागिने आणि व्यवसायाशी संबंधित कागदपत्रेही देवी समोर ठेवा. यानंतर लक्ष्मी आणि गणेशाला फुले अर्पण करा.त्यानंतर, देवी लक्ष्मीच्या मूर्तीला पंचामृत अर्पण करा. यासह मिठाई अर्पण करण्याबरोबरच तिला हळद, कुंकूसह पूजेचे अवश्यक ते सर्व साहित्य आर्पण करा. त्यानंतर आरती करत सुख-समृद्धीसाठी प्रर्थना करावी. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.